शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मोठय़ा अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 11:45 IST

विशेष मोहीम : 176 किलो कॅरीबॅग जप्त; दहा हजाराचा दंडही वसूल

ठळक मुद्देभंगारच्या दुकानांवर कारवाईजागेवरच प्रत्येकी पाच हजाराचा दंडफुले मार्केटमधील  गाळेधारकांना दिली समज

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13 - महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विशेष मोहीमेत मंगळवारी काटय़ाफाईल व इस्लामपुरातील पक्की अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. याच कारवाई दरम्यान पोलनपेठ भागात प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणा:या दोन दुकानदारांकडून 176 किलो कॅरीबॅग जप्त करण्यात येऊन त्यांच्याकडून दहा हजाराचा दंड वसूल करण्यात आला. सलग दुस:या दिवशी सकाळी 9 वाजेपासून माहीमेस सुरूवात झाली. मनपातील अधिकारी व कर्मचारी मिळून 300 जणांचा ताफा या मोहीमेत सहभागी झाला होता. जप्तीची कारवाई सुरूच फुले मार्केट, गांधी मार्केटमध्ये व परिसरातील विक्रेत्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. फुले मार्केटमधील कारवाईत 57 झाडू, 20 भांडे स्टॅँड, कॅरेट 3 , स्टिलचे 3 रॅक, स्टिलचे डबे 3, सुभाष चौकातून   एका गल्लीतून 2 पेटय़ा जप्त करण्यात आल्या, पाईप 11 नग, दुकानांमध्ये चढण्यासाठी रस्त्यावर पाय:या ठेवल्या होत्या त्या 3, भांडे ठेवण्याचे 3 स्टॅँड असे साहित्य जप्त करण्यात आले. इस्लामपुरातील रस्ता मोकळाइस्लामपूरा भागात रस्त्याच्या दुतर्फा काही दुकाने आहेत. या व्यावसायिकांनी रस्त्यावर पाच फुटांर्पयत पक्के ओटे व त्यावर शेड उभारल्याने हा रस्ता अतिशय अरूंद झाला होता. हे पक्के बांधकामाचे आटे व शेड जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले. 

फुले मार्केटमध्ये गुप्ता शेव भांडार या विक्रेत्याने मोठी जागा व्यापली होती. या विक्रेत्याचे अतिक्रमण काढण्यात आले तसेच अन्य गाळेधारकांनी रस्त्यावर शेडची उभारणी केली असल्याचे लक्षात आल्याने ते काढून घ्यावे अन्यथा मनपाकडून जेसीबी लावून ते काढले जाईल असा इशारा देण्यात आला. काटय़ाफाईल भागात दोन भंगार विक्रेत्यांनी मोठी जागा व्यापली होती. ही दोन्ही दुकाने आज काढण्यात आली. सायंकाळर्पयत भंगार विक्रेता या ठिकाणचे सामान हलवत होता. तर काही भाजी विक्रेत्यांची भाजीही या परिसरातून जप्त करण्यात आली. अतिक्रमणांवर कारवाई दरम्यान पोलन पेठ , शिवाजी रोड वरील श्रीराम प्लास्टीक व शिव प्लास्टीक येथे 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या  प्लास्टीक पिशव्या विक्री होत असल्याचे लक्षात आले. तसेच   चहाचे प्लास्टिकचे कपही आढळून आले. असे जवळपास 176  किलो साहित्य या ठिकाणाहून  जप्त करण्यात आले.  या व्यावसायिकांना जागीच   प्रत्येकी पाच हजाराचा  दंड करण्यात येऊन वसुली करण्यात आली.