शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

निम्मे शेरी गाव सहा महिन्यांपासून ‘अंधारात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 18:19 IST

नागरिकांमध्ये संताप : नवीन ट्रान्सफॉर्मर बसवूनही बऱ्याच दिवसांपासून कार्यान्वित नाही

पहूर : जामनेर तालुक्यातील शेरी गावातील वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला, मात्र अद्यापही तो कार्यान्वित करण्यात आला नाही. यामुळे गावाचा काही भाग सहा महिन्यांपासून अंधारात आहे.पहूर गावापासून तीन कि.मी. अंतरावर शेरी हे गाव आहे. या गावात नेहमी विजेचा प्रश्न निर्माण होत होता. यासाठी सहा महिन्यांपूर्वी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. मात्र ट्रान्सफॉर्मर सुरू झाला नाही. यासंदर्भात सरंपच मीरा सटाले यांनी वेळोवेळी पहूर येथील वीजवितरण कार्यालयाचे सहायक अभियंता संजय सरताळे यांच्याकडे पत्रव्यवहार करून तक्रार दिली आहे. मात्र सरताळे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गावातील विद्युत तार बदलविण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सरताळे यांच्याकडे पत्र दिले आहे. या पत्राचीही दखल घेतली नसल्याचे सरंपच मीरा सटाले यांनी सांगितले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे. याची वरिष्ठ पातळीवरून दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही केली जात आहे.यासंदर्भात संबंधित ठेकेदाराला सरपंचांनी भ्रमणध्वनीवर संपर्क करून समस्या सांगितली असता ठेकेदार तुळशीराम सटाले यांनी माहिती दिली की, पालघर येथून ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यासाठी कर्मचारी पाठविले असून यासाठी साहाय्यक अभियंता यांच्याकडे परमिट घेण्यासाठी गेल्यावर त्यांनी परमिट दिले नाही. त्यामुळे आलेले कर्मचारी काम न करता रिकाम्या हाताने रवाना झाले .