शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खान्देशातून दररोज १५० ट्रक कापूस गुजरातकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 18:25 IST

कापसाला रास्त भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकºयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यातच गुजरात शासनाने कापसावर५०० रुपयाचा बोनस जाहीर केल्यामुळे खान्देशातून दररोज सुमारे १५० ट्रक कापूस गुजरातकडे रवानाहोतआहेत. मात्र यामुळे शेतकºयांना कवडीमात्र फायदा होत असून, व्यापारीच ‘गब्बर’ होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे कापसावर बोनस दिल्याने शेतकºयांचा कल गुजरातकडे व्यापारीच होताहेत ‘गब्बर’ खासगीत ३ लाख गाठींची खरेदी तर ‘पणन’मध्ये ठणठणाट

आॅनलाईन लोकमत

अजय पाटील

जळगाव,दि.१४-कापसाला रास्त भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकºयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यातच गुजरात शासनाने कापसावर५०० रुपयाचा बोनस जाहीर केल्यामुळे  खान्देशातून दररोज सुमारे १५० ट्रक कापूस गुजरातकडे रवानाहोतआहेत. मात्र यामुळे शेतकºयांना कवडीमात्र फायदा होत  असून,  व्यापारीच ‘गब्बर’ होत असल्याचे चित्र आहे.

खान्देशात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. यंदादेखील खान्देशात सुमारे ६ लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासूनचा कापसाचा बाजार यंदा तेजी येण्याची शक्यता होती. त्यामुळे हमीभावचे दर देखील वाढण्याची अपेक्षा होती. मात्र सर्व अपेक्षा फोल ठरल्या असून, यंदाही कापूस उत्पादक शेतकºयांना फटका बसला आहे.

‘जीएसटी’वर परिणामशेतकºयांना यंदा कापूसच्या बोनसची शक्यता फारच कमी आहे. गुजरात सरकारकडून कापसाला बºयापैकी दर आहे. त्यामुळे खान्देशातून आतापर्यंत १५ हजारकापसाचेट्रक  गुजरातला रवानाझालेआहेत. त्याचा थेट परिणाम जीएसटीवर देखील होत असून, शेतकºयांकडून व्यापाºयांना माल विक्री करताना कुठलाही कर लागत नाही.

महाराष्टत बोनस का नाही?गुजरात सरकारने प्रतिक्ंिवटल ५०० रूपये बोनस जाहीर करून तेथील कापूस उत्पादक शेतकºयांना खूश करण्याचा प्रयत्न केला.त्या ठिकाणचा हमीदर महाराष्टÑाइतकाच  प्रतिक्ंिवटल ४ हजार ३२० रुपये इतकाच आहे. मात्र  बोनस ५०० रूपये मिळतअसल्याने ४ हजार ८२० रूपये भावशेतकºयांना मिळत आहेत. राज्यात मात्र हमीदर कमी असताना शेतकºयांकडून प्रतवारीचे निकष लावले जावून मालाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकºयांना नाईलाजास्त व्यापाºयांना कापूस विक्रीकरावा लागत आहे. त्यामुळे राज्यशासनाने देखील कापसावर बोनस जाहीर करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.

लोकप्रतिनीधींची चुप्पीराज्यातील कापूस गुजरातकडे जात असताना, लोकप्रतिनीधी मात्र याबाबत  एक शब्दही बोलायला तयार नाहीत. कापसाच्या हमीभावासाठी आंदोलन करणारे तत्कालीन आमदार व विद्यमान जलसंपदा मंत्री गिरीश महाजनहीयाबाबतबोलायलातयारनाही.

 खासगीत ३ लाख गाठींची खरेदी तर ‘पणन’मध्ये ठणठणाट१. खान्देशातील खासगी जिनींगमध्ये आतापर्यंत ३ लाख गाठींची खरेदी झाली असून, खासगी जिनींगमध्ये शेतकºयांना प्रतीक्विंटल४,४०० ते ४,५०० पर्यंत दर दिला जात आहे.२. शासनाच्या पणन महासंघाच्या कापूस  खरेदी केंद्रावर एकाही शेतकºयानेअद्याप कापूस विक्री केलेला नाही. सीसीआयच्या १३ केंद्रावर देखील पणन महासंघासारखीच स्थिती आहे.३. शेतकºयांकडून हा माल थेट गुजरातमध्ये जात नसून, खान्देशातील शेतकरी स्थानिक व्यापाºयांना आपला माल विक्री करतात व व्यापाºयांकडून हा माल गुजरातमध्ये विक्री केला जात असल्याने व्यापारीच ‘गब्बर’ होत असल्याचे चित्र आहे.

कोट..गुजरात सरकारने बोनस दिल्याने शेतकºयांचा कल गुजरातकडे अधिक आहे. दिवसभरात दीडशे ट्रक भरुन कापूस गुजरातकडे जात आहेत. बोनस जाहीर न झाल्यास शेतकºयांकडून हे पाऊल उचलले जात आहे.-प्रदिप जैन, अध्यक्ष खान्देश जिनींग असोसिएशन

राज्यशासनाने कापसावर बोनस जाहीर करण्याची गरज आहे. शेतकरी आत्महत्याकरीत असताना स्थानिक लोकप्रतिनीधी देखील काहीही बोलायला तयार नाही.-संजय पवार, संचालक,पणन महासंघ