शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाचा पान्हा आटला, दूध उत्पादकांची होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:05 IST

योजना गुंडाळली

जिजाबराव वाघचाळीसगाव : दूध उत्पादक शेतकऱ्यांना मध्यंतरी सरकारने प्रती लीटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा अंमलात आणली होती. मात्र अवघ्या सहाच महिन्यात ही योजनाच गुंडाळण्यात आल्याने ऐन दुष्काळात शेतकºयांची होरपळ होत आहे. दुष्काळी स्थितीचा विचार करता ही योजना सुरूच ठेवावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकºयांची आहे. अनुदानाशिवाय दूध संघांना प्रती लीटर २५ रुपये देणे शक्य नसल्याचे सांगत दूध उत्पादकांकडून नाराजीचा सूर आहे.शेतकºयांच्या दुधाला योग्य दर मिळावा यासाठी राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकºयांना प्रती लीटर पाच रुपये अनुदान देण्याची योजना सुरू केली होती. ३१ जानेवारी रोजी योजनेला अवघे १८० दिवस म्हणजेच सहा महिने होताच सरकारने तिचा गाशा गुंडळला. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने शेती उत्पादनातून शेतकºयांच्या पदरात फारशे काही पडले नाही. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादन करणाºया शेतकºयांना दूध अनुदान योजना बंद होण्याचा मोठा फटका बसत आहे. अनुदान बंद झाल्याने धवलक्रांतीचे अर्थकारण बिघडून दुष्काळाच्या वणव्यात शेतकºयांची होरपळही सुरू झाली आहे. सरकारने अनुदान सुरुच ठेवावी, अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरू लागली आहे.चाळीसगावला दरदिवशी ४० हजार लीटरचे संकलनजिल्हा दूध संघाने चाळीसगाव येथे दुधाची उपलब्धता पाहता पंधरा दिवसांपूर्वी संकलन केंद्र सुरू केले असून येथे दरदिवशी ४० हजार लीटर दूध संकलित होत आहे. सद्यस्थितीत संघाकडून हे दूध २५ रुपये प्रती लीटरने खरेदी केले जात असले तरी, प्रती लीटर पाच रुपये मिळणाºया अनुदानामुळेच हे भाव देणे संघाला शक्य व्हायचे. अनुदानच बंद झाल्याने संघ खरेदी भावाबाबत काय निर्णय घेते, याकडे तालुक्यातील दूध उत्पादक शेतकºयांचे लक्ष लागले आहे.२५ रुपये प्रती लीटर भाव योग्यचारा-पाण्याची गंभीर समस्या, पशुखाद्याच्या बाजारात असणारी तेजी, गुरांचे आजारपण, वातावरणाचा होणार परिणाम इत्यादी कारणांमुळे शेतकºयांना दूध २५ रुपये प्रती लीटर विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यापेक्षा कमी दर मिळाल्यास उत्पादक शेतकरी भरडून निघणार आहे. अनुदान बंद केल्याने शेतकºयांमध्ये सरकारविषयी असंतोष खदखदत आहे.संघाचे अनुदानाचे १० कोटी रुपये थकलेदूध उत्पादक शेतकºयांना सावरण्यासाठी राज्य सरकारने १ आॅगस्ट २०१८ पासून प्रती लीटर पाच रुपये अनुदान देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी सुरु केली. पहिल्या टप्प्याची मुदत ३१ आॅक्टोबर रोजी संपण्याआधीच अनुदान योजनेला पुन्हा ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली. या सहा महिन्याच्या काळात अनुदानापोटी जिल्हा दूध संघाला अवघे ६८ लाख रुपये मिळाले असून १० कोटी रुपये सरकारकडून येणे बाकी आहे. आता अनुदानच बंद झाल्याने थकबाकी कधी मिळणार ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दूध संघ झळ सोसून शेतकºयांकडून २५ रुपये प्रती लीटर दराने दूध खरेदी करीत आहे.दरदिवशी सव्वा चार लाख लीटर दुधाचे संकलनजिल्हा दूध संघाकडून दरदिवशी सव्वा चार लाख लीटर दुधाचे संकलन केले जाते. यातील सव्वा दोन लाख लीटर दुधाचे दुग्धजन्य पदार्थ तयार करून विकले जातात. उर्वरित दोन लाख लीटरची दूध पावडर बनवली जाते. गेल्या वर्षभरापासून दूध पावडरचे भाव कोसळले असून तेजी नसल्याने फटका सहन करावा लागत आहे.राज्यभरात प्रती दिन पाच कोटीचे अनुदानराज्यभरात विविध संस्थांमार्फत शेतकºयांकडून उत्पादीत दूध खरेदी केले जाते. प्रती दिन एक कोटी लीटर दुधाचे संकलन होते. त्यानुसार शेतकºयांना प्रती दिन पाच कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. अनुदान योजनेला ३१ जानेवारी पर्यंत १८० दिवस पूर्ण झाले असून यापैकी फक्त ७० दिवसांचे ३५० कोटी रुपये अनुदान सरकारने अदा केले आहे. ११० दिवसांचे ५५० कोटी रुपये सरकारकडे थकल्याने गेल्या आठवड्यात अनुदान योजनेला मुदतवाढ देण्याचे दुग्ध विकासमंत्र्यांचे सूतोवाच केवळ वल्गना ठरल्याचा रोष व्यक्त होत आहे.शेतकºयांना आर्थिक झळ बसू नये. याबरोबरच दुष्काळात त्यांना मदतीचा हात देण्यासाठी अडचणी असतानाही आम्ही संघामार्फत २५ रुपये प्रती लीटरने दूध खरेदी करीत आहोत. अनुदानाचे १० कोटी रुपये सरकारकडे थकले आहेत. सहा महिन्यात ६८ लाख रुपये मिळाले आहे. सरकारने अनुदान बंद करू नये. याचा मोठा फटका दूध संघाबरोबर प्रत्यक्ष शेतकºयांनाही बसणार आहे.- प्रमोद पाटील, संचालक जळगाव जिल्हा दूध संघ

दूध उत्पादनाचा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत असते. अनुदान बंद झाल्याने दुधाचे दर कमी होतील. शेतकºयांना हे परवडणारे नाही.- रोहन वाघ, दूध उत्पादक उंबरखेडे, ता. चाळीसगावदुष्काळाने कंबरडे मोडले असताना सरकारने दूध अनुदान बंद करून शेतकºयांना वाºयावर सोडले आहे. अनुदानाअभावी उत्पन्न आणि पशुपालन जिकरीचे होईल. चारा - पाणी टंचाईने अगोदरच डोके वर काढले आहे. पशुखाद्याचेही भाव चढे आहेत.- ज्ञानेश्वर अहिरे, दूध उत्पादक, उंबरखेडे ता. चाळीसगावदुष्काळामुळे अस्मानी दाह सोसणाºया शेतकºयांना दूध अनुदान बंद केल्याने सुलतानी मार सहन करावा लागणार आहे. सरकारने अनुदानाच्या निर्णयाचा फेरविचार करावा. पुढच्या काळात चारा - पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे.- दिनेश पाटील, दूध उत्पादक, पिंपळवाड म्हाळसा, ता. चाळीसगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव