शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

नूतन मराठा महाविद्यालयात विद्याथ्र्याच्या 2 गटात हाणामारी

By admin | Updated: April 1, 2017 00:56 IST

पोलिसांचा लाठीमार : रस्त्यावरही दगडफेक; दोन जण जखमी

जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता दोन महाविद्यालयातील विद्याथ्र्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. शंभर ते दिडशे तरुण एकमेकावर भिडले होते. दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक झाली. त्यात लहान भावाला घेण्यासाठी आलेले पवन सुधाकर बाविस्कर (वय 19 रा.आसोदा,ता.जळगाव) व निलेश घनश्याम वाघ (वय 20 रा.हरिओम नगर, जळगाव) हे दोन तरुण जखमी झाले. या वादामुळे गणेश कॉलनी व कोर्ट चौककडे जाणा:या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.दरम्यान, गुरुवारी प्रताप नगरात सेवानिवृत्त फौजदाराच्या दुकानात टवाळखोरांनी हल्ला चढवून बाप-लेकाला मारहाण केली होती. त्यानंतर दुस:याच दिवशी पुन्हा ही हाणामारी झाली. शुक्रवारी दहावीच्या पेपरसाठी नूतन मराठा महाविद्यालयात विद्याथ्र्याची गर्दी होती. साडे दहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन 60 ते 70 तरुण नूतन मराठा महाविद्यालयात आले व रिंगण करुन त्यांनी काही तरुणांना मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी अॅँग्लो उर्दू हायस्कूलचेही काही विद्यार्थी तेथे धावून आले. दोन्ही गटाकडून शंभराच्यावर तरुण एकमेकावर भिडल्याने महाविद्यालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. विद्याथ्र्यामध्ये पळापळ झाली होती तर शिक्षकही कमालीचे घाबरले होते.पोलीस येताच पळापळमहाविद्यालयात हाणामारी व दगडफेक होत असल्याने शिक्षकांनी जिल्हा पेठ पोलिसांना कळविले. उपनिरीक्षक गजानन राठोड, महेंद्र बागुल, राजू मेढे, छगन तायडे यांच्यासह शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारीही तत्काळ दाखल झाले.तरीही गर्दी नियंत्रणात येत नसल्याने नियंत्रण कक्षातून दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. दगडफेक करणा:या तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला तेव्हा पळापळ झाली व गर्दी कमी झाली.चौघांना घेतले ताब्यात; सलग दुस:या दिवशी वाददगडफेकीत पवन सुधाकर बाविस्कर व निलेश घन:श्याम वाघ हे दोन तरुण जखमी झाले. त्यांना पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गर्दीत प्रवेशद्वार उघडण्यास मज्जाव करणा:या हिरा प्रकाश सपकाळे (वय 20 रा.मोहन टॉकीज, जळगाव), मयुर भागवत चौधरी (वय 18 रा.कांचन नगर, जळगाव), हिमांशु संजय भाटीया (वय 18 रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) व नानीमोद्दीन सलीमोद्दीन शेख (वय 18 रा.गेंदालाल मील, जळगाव) या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संध्याकाळर्पयत कोणीही तक्रार द्यायला न आल्याने  प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना सोडून देण्यात आले. घटनेचे कारण या तरुणांनीही सांगितले नाही.गोंधळामुळे वाहतूक खोळंबलीदोन्ही गटाकडून रस्त्यावर दगडफेक झाल्याने पळापळ झाली होती. यावेळी मुख्य रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. अर्धा तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. यावेळी निष्पाप लोकांना व विद्याथ्र्याना दगडाचा मार सहन करावा लागला. इतकी मोठी घटना घडल्यानंतरही महाविद्यालयाकडून तक्रार देण्यात आली नाही. किंवा घटनेचेही कारण कोणी सांगितले नाही.