शान्या याने चोपडा शहरातून दुचाकी चोरी केली व अमळनेर व चोपडा तालुक्यात किराणा व दारूचे दुकान फोडल्याचे उघड झाले आहे. चोरीच्या दुचाकीसह त्याला चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शान्या हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरु्ध अडावद, ता. चोपडा येथे दोन, अमळनेर एक, चोपडा ग्रामीण एक व चोपडा शहर एक असे पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. शान्या हा चोरीची दुचाकी घेऊन अमळनेर व चोपडा तालुक्यातील घरफोडी करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार अनिल जाधव, इद्रीस पठाण, दीपक शिंदे व अशोक पाटील यांचे पथक त्याच्या मागावर होते. शनिवारी त्याला माचला येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीबाबत विचारणा केली असता, चोपडा शहरातून चोरल्याची कबुली दिली. त्याने दारूचे दुकान व किराणा दुकान फोडल्याचेही उघड झाले.
दुचाकी चोरी करून फोडले किराणा अन् दारू दुकान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST