शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

महात्मा गांधींना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

जळगाव : येथील श्रीराम माध्यामिक विद्यालयात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्याध्यापक दिवाकर जोशी व अतुल चाटे यांच्याहस्ते गांधीजींच्या प्रतिमेला ...

जळगाव : येथील श्रीराम माध्यामिक विद्यालयात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्याध्यापक दिवाकर जोशी व अतुल चाटे यांच्याहस्ते गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या जीवनकार्याचींही माहिती देण्यात आली. सूत्रसंचालन अतुल चाटे यांनी तर आभार राजश्री तायडे यांनी मानले.

बालनिकेतन विद्यामंदिर

जळगाव : प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिरात बालवाडी शिक्षिका ज्योती सपकाळे यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी, नीलेश नाईक, श्रीकांत पाटील आदी शिक्षक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी उज्ज्वला जाधव, वंदना नेहते, रशिदा तडवी, राहुल धनगर, राजेंद्र पवार आदींनी परिश्रम घेतले

महाराणा प्रताप विद्यालय

जळगाव : दि. पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप माध्यामिक व उच्च माध्यामिक विद्यालयात शनिवारी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापिका साधना शर्मा यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपशिक्षक संजय चौधरी, उपमुख्याध्यापक डी. एस. पाटील, पर्यवेक्षक डी. बी. सोनवणे, विभागप्रमुख गजेंद्र पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

जळगाव : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेस पक्षाचे समन्वयक विकास पवार, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांच्याहस्ते गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांच्यासह सेवादलाचे

जिल्हाध्यक्ष वाय एस. महाजन, मीनाक्षी चव्हाण, संजय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.