अमळनेर/चोपडा, जि.जळगाव : अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करावा या मागणीसाठी आयोजित विशाल हुंकार सभेच्या प्रचारासाठी अमळनेर व चोपडा येथे रविवारी मोटारसायकल रॅली काढण्यात आल्या.अमळनेर येथे प्रताप मिल परिसरातून श्रीराम नामाचा जयघोष करीत रॅलीला सुरुवात होऊन रेल्वे स्टेशन, स्टेट बँक, सुभाष चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार, वाडी चौक , माळी वाडा, झामी चौक, पवन चौक, बालेमीया मशीद, पाचपावली मंदिर, बसस्थानक, महाराणा प्रताप चौक, मंगलमूर्ती चौक मार्गे छत्रपती शिवाजी नाट्यगृह येथे रॅली विसर्जित झाली. शहरातील प्रमुख मार्गावरुन निघालेल्या मोटारसायकल रॅलीने वातावरण भगवेमय झाले होते.रॅलीत अर्बन बँक चेअरमन लालचंद सैनानी, विहिंपचे सुरेश पवार, आशिष दुसाने, जिगर शिंदे, हितेश नारखेडे, भूषण चौधरी, दीपक सोनार, विशाल पवार, जयेश पाटील, सुरज गोत्राड, पंकज भावसार, योगीराज चव्हाण, समाधान पाटील, गणेश भोई, प्रीतेश सोनार, राहूल पाटील, गौरव पाटील, राहूल अहिरे यांच्यासह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू महासभेचे अनेक कार्यकरते उपस्थित होते.विहिंपतर्फे अमळनेरला विशाल हुंकार सभाअयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्मितीसाठी संसदेत कायदा करण्यात यावा या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सोमवारी दुपारी चार वाजता अमळनेर येथे विशाल हुंकार सभा आयोजित केली आहे. बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक श्री सोहमजी सोलंकी यांच्यासह विविध संत, धर्माचार्य सभेत मार्गदर्शन करतील.चोपड्यात हुंकार सभेच्या प्रचारार्थ रॅलीचोपडा येथे सर्व हिंदत्ववादी युवकांनी मोटारसायकल रॅली काढून वातावरण निर्मिती केली. तसेच हुंकार सभेला नागरिकांनी उपस्थिती देण्याचे आवाहन केले. रॅलीची सुरुवात शासकीय विश्रामगृहापासून करण्यात आली, तर समारोप पाटील गढीतील श्रीराम मंदिराजवळ करण्यात आला. यापूर्वी संदीप पाटील व श्रीराम बारी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. रॅलीमध्ये प्रवीण जैन, मुकेश पारिख, सुनील सोनगिरे, शुभम महाजन, महेंद्र शेटे, राहुल महाजन, सोनू महाजन, पवन चित्रकथी, अण्णा पाटील, विशाल भोई, अजय जैन, अजय राजपूत, व्यंकटेश पवार, राकेश राजपुत, सनी पाटील, अजय भोई आदी हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.
अमळनेर व चोपडा येथे हिंदू संघटनांतर्फे भव्य मोटारसायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:11 IST
अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करावा या मागणीसाठी आयोजित विशाल हुंकार सभेच्या प्रचारासाठी अमळनेर व चोपडा येथे रविवारी मोटारसायकल रॅली काढण्यात आल्या.
अमळनेर व चोपडा येथे हिंदू संघटनांतर्फे भव्य मोटारसायकल रॅली
ठळक मुद्देजय श्रीरामाच्या जयघोषाने शहरे दणाणलीअनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभागविहिंपतर्फे अमळनेरला विशाल हुंकार सभा