शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक व गटविकास अधिका:यांना जाहीर कार्यक्रमाद्वारे आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2017 18:17 IST

आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीत होणार साडी, चोळी बांगडीचा आहेर देण्याचा सोहळा

 अमळनेर,दि.5 - संत सखाराम महाराज यांची जन्मभूमी असलेले गाव सरपंच आणि गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या दुर्लक्षामुळे मूलभूत सुविधांपासून वंचित राहत आहे. त्यामुळे आजी माजी ग्रामपंचायत सदस्यांनी गांधीगिरी करीत अधिकारी व पदाधिका:यांना साडी चोळी, टिकली बांगडी चा आहेर देण्याच्या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करून पत्रिका वाटप केल्या आहेत. या कार्यक्रमाची सोशल मिडीयावर जोरात चर्चा आहे. 

   गुरुवार 11 रोजी पिंपळी येथे सकाळी 9  वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्या मनीषा महाजन यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पत्रिकेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार शिरीष चौधरी, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, जि. प. सदस्य मिनाबाई पाटील, पं. स सदस्य निवृत्ती बागुल, माजी उप सभापती उदय पाटील, माजी सभापती श्याम अहिरे, पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक विकास वाघ यांची नावे आहेत. माजी ग्रा.पं. सदस्य मनोज महाजन, विद्यमान सदस्य गुलाब महाजन, वैशाली महाजन, विकासो सदस्य रवींद्र महाजन  यांचे निमंत्रक म्हणून नावे आहेत. 
या कारणांसाठी केले कार्यक्रमाचे आयोजन 
1) पिंपळी गाव स्वच्छतेपासून दूर नेले. 
2) 10 दिवसात केवळ 10 मिनिटे पाणी मिळते.
3) पाणी पुरवठा करणा:या मोटारी 8 दिवसात जाळली.
4) ग्रामपंचायत ची कर वसुली 5} पेक्षा कमी झाली. 
5) सरपंच व ग्रामसेवक दररोज भेटत नाहीत. 
6) कर्तव्यदक्ष ग्रामसेवक वासू मारवडकर याची बदली केली.
7) पाण्यात टी.सी एल चा वापर न करणे. 
8) तंटायुक्त गाव केल्याबद्दल .
 
 
वारंवार तक्रारी करून तसेच आंदोलने करूनही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
- मनोज महाजन, माजी ग्रा.पं.सदस्य.