शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सुविधा मिळत नसल्याने चक्क ग्रामपंचायतीचे उत्तरकार्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 18:20 IST

अमळनेर,दि.20 : स्वच्छता, आरोग्य, पाणी ,दिवे यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यास ग्रामसेवक आणि सरपंच अकार्यक्षम ठरल्याचा निषेध म्हणून आजी माजी ग्रा.पं.सदस्यांनी पिंपळी ग्रामपंचायतीचा दशक्रिया व उत्तरकार्य विधी करण्यासाठीचा अजब शोक संदेश पत्रिका तयार केली आहे.

ठळक मुद्देगांधी जयंती दिनी कार्यालयाचे गंधमुक्ती, उत्तरकार्य व पिंड दान कार्यक्रममूलभूत सुविधा पुरविण्यास ग्रामसेवक आणि सरपंच अकार्यक्षम ठरल्याचा निषेधवारंवार मागणी करूनही होत नाही उपयोग

ऑनलाईन लोकमतअमळनेर,दि.20 : स्वच्छता, आरोग्य, पाणी ,दिवे यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यास ग्रामसेवक आणि सरपंच अकार्यक्षम ठरल्याचा निषेध म्हणून आजी माजी ग्रा.पं.सदस्यांनी पिंपळी ग्रामपंचायतीचा दशक्रिया व उत्तरकार्य विधी करण्यासाठीचा अजब शोक संदेश पत्रिका तयार केली आहे.11 ऑगस्ट 2015 पासून पिंपळी येथे पाणी, आरोग्य, स्वच्छता, पथदिवे पुरविण्यास सरपंच, ग्रामसेवक अकार्यक्षम ठरले आहेत. वारंवार मागणी करूनही उपयोग होत नाही. ग्रामपंचायत कार्यालय जणू काही देवाज्ञा झाले म्हणून 2  ऑक्टोबर या गांधी जयंती दिनी कार्यालयाचे गंधमुक्ती, उत्तरकार्य व पिंड दान कार्यक्रम सकाळी 11 वा पिंपळी येथे गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या हस्ते आयोजित केल्याची निषेधात्मक शोक संदेश पत्रिका तयार केली आहे. पत्रिकेत शोकाकुल म्हणून ग्रा पं चे माजी सदस्य मनोज महाजन, ग्रापं सदस्य मनीषा महाजन, वैशाली महाजन, गुलाब महाजन, विकासो सदस्य रवींद्र महाजन यांची नावे आहेत. पिंपळी हे गाव प्रतिपंढरपूर समजल्या जाणा:या अमळनेरच्या  संत सखाराम महाराजांची जन्मभूमी असलेले आदर्श गाव आहे. या अभिनव निषेध पत्रिकेची मात्र सर्वत्र चर्चा आहे.

 

2 ऑक्टोबर रोजी ग्रामसभा होणार आहे. ग्रामस्थांना सुविधा मिळत नसल्याने ग्रा.पं.चे विधिवत उत्तरकार्य करून गावाला भोजनही देण्यात येणार आहे.   -मनोज महाजन, माजी ग्रामपंचायत सदस्य, पिंपळी, ता.अमळनेर

दोन महिन्यांपासून पदभार घेतला आहे. दोन टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. पथदिवे लावणे सुरु आहे. गेल्यावेळी झालेल्या धुरळणीचे पैसे दिलेले नव्हते. ते देऊन दोन दिवसात धुरळणी करण्यात येईल.-नितीन पाटील, ग्रामसेवक, पिंपळी.