शेतकऱ्यांना फटका
अमळनेर तालुक्यात भरडधान्य खरेदी योजनेत ज्वारी खरेदी झाली नाही, तर प्रत्येक शेतकऱ्याचे क्विंटलमागे एक हजार रुपयांचे नुकसान होणार आहे. बाजार समितीतील १५ हजार क्विंटल क्षमता असलेले गोदाम शेतकी संघाने मागणी केल्याचे व्यवस्थापक संजय पाटील यांनी सांगितले तर याबाबत माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता तहसीलदार मिलिंद वाघ यांचा भ्रमणध्वनी बंद होता. प्रशासन यात गंभीर नसल्याचे लक्षात येत असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.