शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रावेर बीएसएनएलचे वीज संयोजन खंडित झाल्याने शासकीय कार्यालय व बँकींग आॅनलाईन व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 14:36 IST

रावेर तालुक्यातील बँकांसह तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, पंचायत समिती, ग्रामीण रूग्णालय, कृषी विभाग, आरोग्य केंद्र, बसस्थानक, महावितरण कार्यालयाची संपर्क यंत्रणा व ब्रॉडबँड इंटरनेट सेवा कोलमडली

रावेर, जि.जळगाव : भारत संचार निगमच्या रावेर उपविभागीय कार्यालयासह नऊ ग्रामीण स्वयंचलित दूरध्वनी केंद्रांची डिसेंबर २०१८ व मार्च २०१९ पासून सुमारे १६ लाख ५० हजारांची वीज बिलांची रक्कम थकल्याने महावितरणने भारत संचार निगमच्या रावेर उपविभागीय अभियंता कार्यालयासह ग्रामीण नऊ स्वयंचलीत दूरध्वनी केंद्रांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कठोर कारवाई शुक्रवारी केली. परिणामी रावेर शहरातील महत्त्वाच्या पोलीस स्टेशन, दुय्यम निबंधक कार्यालय, तहसील, पंचायत समिती, पालिका, ग्रामीण रूग्णालय, महावितरण उपविभागीय कार्यालय, रावेर बसस्थानक, शहरासह ग्रामीण भागातील राष्ट्रीयीकृत बँका व आरोग्य केंद्रांची, ग्रामपंचायत व महसूल तलाठी सजांची संपर्क यंत्रणा कोलमडली आहे. ब्रॉडबँड इंटरनेट सेवाही खंडित झाल्याने आॅनलाईन सेवेची यंत्रणा ठप्प होवून जनसामान्यांचे कमालीचे हाल होत आहेत.भारत संचार निगमच्या रावेर उपविभागीय अभियंता कार्यालयाचे माहे डिसेंबर २०१८ पासून तर ग्रामीण भागातील खानापूर, वाघोड, खिर्डी, खिरोदा आदी नऊ स्वयंचलित दूरध्वनी केंद्रांचा मार्च २०१९ पासून सुमारे १६.५ लाख रुपयांची वीज बील थकबाकी थकली आहे. यामुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले आहे.महावितरणच्या या कठोर कारवाईमुळे भारत संचार निगमला सोयरसुतक नसले तरी तालुक्यातील पोलीस, महसूल, दुय्यम निबंधक, आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास, कृषी, वीज, बसस्थानक व राष्ट्रीयीकृत बँकांसह सहकारी संस्थांची संपर्क यंत्रणा व ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पूर्णत: कोलमडून पडली आहे. परिणामी शासकीय व निमशासकीय कार्यालयांसह बँकींग व्यवहार ठप्प झाले आहे. जनजीवन कमालीचे प्रभावित झाले असून, जनसामान्यांचे कमालीचे हाल होत आहेत.

टॅग्स :MSRDCराज्य रस्ते विकास महामंडळRaverरावेर