शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४२ कोटींच्या निधीला शासनाकडून ग्रीन सिग्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:14 IST

आमदार सुरेश भोळेंची माहिती : वर्षभरापूर्वी शासनाने दिली होती स्थगिती; ५८ कोटींच्या निधीची प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

आमदार सुरेश भोळेंची माहिती : वर्षभरापूर्वी शासनाने दिली होती स्थगिती; ५८ कोटींच्या निधीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराच्या विकासासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानअंतर्गत १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, विद्यमान शासनाने स्थगिती दिल्याने शहरातील विकासकामे थांबली होती. मात्र, १०० कोटींपैकी मंजूर ४२ कोटींच्या कामांवरील स्थगिती शासनाने बुधवारी उठविली असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली. दरम्यान, उर्वरित ५८ कोटींच्या कामांच्या प्रस्तावाला अद्याप तांत्रिक मान्यता मिळाली नसून, हा निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याची माहितीही भोळे यांनी दिली.

मनपात सत्तांतर होऊन भाजपची एकहाती सत्ता आली. त्यामुळे शहराच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीतून शहरात गटारी, नाल्यांची संरक्षण भिंत, मोकळ्या जागांचा विकास, जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम अशी कामे केली जाणार होती. मात्र, शासनाने स्थगिती दिल्यामुळे १०० कोटींतून एक रुपयाही खर्च झालेला नव्हता. आता मात्र स्थगिती उठविण्यात आल्याने ही कामे होऊ शकणार आहेत.

निविदा प्रक्रियेबाबत संभ्रम ?

या निधीतून विकासकामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राधिकृत करण्यात आले आहे. १०० कोटीतून ४२ कोटींच्या कामाची निविदा काढण्यात आली होती. त्याच कालावधीमध्ये शासनाने स्थगिती दिली होती. मात्र, निविदा प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. स्थगिती उठविल्यानंतर ही निविदा प्रक्रिया पुन्हा राबवावी लागते की काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान, याबाबत मनपा आयुक्तांना विचारले असता, याबाबत अजून माहिती नसल्याचे सांगितले.