शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात शासकीय बांधकामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 12:20 IST

नवीन निविदांवरही बहिष्कार : बिल्डर असोसिएशनचा निर्णय

ठळक मुद्देकंत्राटदार हवालदिलनवीन निविदांना प्रतिसाद नको जिल्हाधिका:यांना निवेदन देणार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 1 - सध्या सुरू असलेल्या शासकीय कंत्राटी कामासह नवीन निविदांवरही  18 टक्के जीएसटी  लागू करण्यात आल्याने याचा कंत्राटदारांना मोठा भरुदड बसणार आहे. त्यामुळे शासकीय कंत्राटदार, ठेकेदार संघटना आक्रमक झाल्या असून याबाबत सकारात्मक निर्णय होत नसल्याने सर्व शासकीय कामे ठप्प झाली आहे तर नवीन निविदांवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय शासकीय कंत्राटदार संघटना, बिल्डर असोसिएशनने घेतला आहे. 1 जुलै पासून वस्तू व सेवाकर लागू झाल्यानंतर  शासकीय कंत्राटातील रस्ते, पूल, धरण, मो:या,  इमारत बांधकाम या कामांवरही  18 टक्के जीएसटी लावला आहे. यामुळे सर्व कंत्राटदार हवालदिल झाले असून यावर तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली. मात्र कोणताही सकारात्मक निर्णय होत नसल्याने सर्व कामे बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, महापालिका, नगरपालिका यांच्या मार्फत चालणारी सर्व विकास कामे ठप्प असल्याचे चित्र आहे. या संदर्भात सोमवारी पत्रपरिषद घेऊन ही माहिती देण्यात आली. या वेळी शासकीय कंत्राटदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास पाटील, सचिव आर.जी. पाटील, बिल्डर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अनिल भाईदास पाटील, संजय पाटील, अभिषेक पाटील, सुनील पाटील, मिलिंद अग्रवाल, उज्‍जवल बोरसे, तुषार महाजन आदी उपस्थित होते. यापुढे कामांच्या ज्या निविदा निघतील त्यावर 18 टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळे निविदांचे दर हे  जीएसटीसह असावे, अशीही मागणी संघटनांची आहे. तसे न झाल्यास या नवीन निविदांवर लागणारा जीएसटी कंत्राटदारांना भरावा लागणार आहे. त्यामुळे या नवीन निविदांना प्रतिसाद न देता त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.  जळगाव जिल्हा कंत्राटदार संघटना, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडीया, जळगाव सेंटर यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, अर्थमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री,  जलसंपदा मंत्री, प्रधान सचिव (बांधकाम), प्रधान सचिव (वित्त), प्रधान सचिव (जलसंपदा) यांना दिले. मात्र काहीही उपाययोजना न झाल्याने  जिल्ह्यातील सर्व शासकीय कंत्राटदारांनी जो पर्यत जीएसटी बाबत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यत सर्व प्रगतीत असलेली विकास कामे बंद केली आहेत. आपल्या या मागण्यांसदर्भात 2  ऑगस्ट  रोजी शासकीय कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी, सभासद जिल्हाधिका:यांना निवेदन देणार आहे. 18 टक्के जीएसटी लागू केल्याने फटकाप्रगतीत असलेली कामे, निविदा निश्चिती झालेल्या  सर्व कामांसाठी जीएसटी लागणार आहे. त्यामुळे शासकीय कंत्राटदारांना मोठा आर्थिक फटका बसणार तर आहेच, सोबत  जुन्या निविदेवर जीएसटी लावण्यात आला असून त्यामुळे ठेकेदारांचा विरोध अधिक वाढला  आहे. प्रगतीत असलेल्या कामांचे निविदा दर पूर्वीच्या कर प्रणालीवर आधारीत होते. मात्र जीएसटी लागू झाल्यापासून या कामांवरही अचानक 18 टक्के जीएसटीचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्यामुळे या कामांवर जीएसटी नसावा, अशी मागणी संघटनेची आहे.