शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

वाळूचोरीला प्रशासनाचा आशीर्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 18:51 IST

वार्तापत्र-महसूल

-सुशील देवकरजिल्ह्यात सुरू असलेल्या वाळूचोरीला प्रशासनाचाच आर्शीवाद असल्याचे यापूर्वीही अनेकदा स्पष्ट झाले असून वडनगरी शिवारात वाळूच्याडंपरने एका शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने ज्या पद्धतीने बोटचेपे धोरण अवलंबले त्यावरून वाळू चोरीला प्रशासनाचाच आशीर्वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक गिरणा नदीपात्रात जळगाव तालुक्यात एकही ठेका गेलेला नाही. आधी वैजनाथचा ठेका होता. तो देखील एरंडोल तालुक्यात होता. त्यातही प्रचंड अवैध वाळू उपसा करून जळगाव शहरात त्याची अवैध वाहतूक जिल्हा प्रशासनाच्या आशीर्वादानेच करण्यात आली. त्याचप्रमाणे धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील वाळू ठेका परिसरातील १० किमी परिसरातून अवैध वाळू उपसा गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यात करोडो रूपयांचा महसूल बुडाला आहे. मात्र महसूल व पोलीस यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाºयांचे वाळू माफियांशी असलेले सख्य कारवाईच्या आड येत गेले. टॉवरचौकाकडून वर्दळीच्या रस्त्याने ही अवजड वाहने सर्रास ये-जा करीत होते. त्यासाठी दोन ठिकाणी गिरणा नदीपात्रात अवैधपणे भराव टाकून रस्ताही करण्यात आला. मात्र डोळेच मिटून घेतलेल्या प्रशासनाला याची माहिती असण्याचे कारणच नाही. वाळूची चोरटी वाहतूक करणाºया भरधाव वाहनांच्या धडकेने निरपराध नागरिकांचे बळी जात असूनही तातडीने दखल घेण्याची गरज जिल्हा प्रशासनाला वाटली नाही. गेल्या वर्षभरापासून दोनगाव ठेका परिसरातील दहा किमी परिसरात गिरणा नदीपात्रात अवैधपणे वाळू उपसा सुरू असून जागोजागी खड्डे पडलेले दिसून येत आहेत. मग महसूल विभागाच्या अधिकाºयांनी कधीच या भागात चक्कर मारली नाही का? की सोयीस्करपणे कानाडोळा केला? एरव्ही सामान्य नागरिकाने थोडे जरी नियमबा' वर्तन केले तर त्याला नियम दाखवित धडा शिकवणाºया महसूल प्रशासनाला नदीपात्रात टाकलेले अवैध रस्ते देखील दिसले नाहीत का? दोनगाव ठेक्यापर्यंत महसूल विभागाचे अधिकारी वर्षभरात एकदाही तपासणीसाठी गेलेच नाहीत का? जर गेले तर त्यांना त्यावेळी हे गैरप्रकार दिसले नाहीत का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. आता सप्टेंबर अखेर ठेक्यांची मुदतच संपत आहे. त्यातच गिरणा नदीपात्रात पाणी असल्याने महसूल प्रशासनाने सोयीस्करपणे हात वर केले आहे. महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकाºयापासून ते वरिष्ठांपर्यंत तसेच पोलीस व वाळू माफिया अशी साखळीच असल्याने कोणत्याच अवैध वाळू व्यावसायिकावर वेळेवर कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. ठेक्याच्या क्षमतेपेक्षा दुप्पटीने वाळू उपसा होऊन गेल्यावरच महसूल विभाग मोजणीसाठी पोहोचतो. त्यानंतर नोटीस बजावून कारवाईचा फार्स केला जातो. प्रत्यक्षात परवानगीपेक्षा कितीतरी पट मलिदा आधीच लाटला गेलेला असतो. कुंपणच शेत खात असल्याने प्रतिबंध करणार कोण? असा सवाल आहे.