४५ वर्षांच्या वरील सर्व नागरिकांना याआधी लसीकरण सुरू होते. आजपासून १८ वर्षांच्या वरील सर्वच नागरिकांना ही लस उपलब्ध झाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आज ६१ जणांचे लसीकरण करण्यात आले.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वांनीच लसीकरण करून घेणे तसेच आपल्याला व आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवणे ही आता काळाची गरज झाली आहे. यासाठी आरोग्य केंद्राचे संपूर्ण कर्मचारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी
डॉ. नीलेश विश्वासराव, एच. व्ही. परदेशी, यु. डी. कुणबी, आशा सेविका वैशाली राजपूत, संगीता देवरे, अर्चना ठाकरे, वैशाली सोनार, मदतनीस गोरवाडकर हे सर्व परिश्रम घेत आहेत. तळवाडे व गणेशपूर उपआरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे.