शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भोवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 15:03 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वास्तव’ या सदरात लिहिताहेत कौस्तुभ परांजपे...

दोरीला गुंडाळून भोवरा फिरवण्यात त्यावेळी वेगळी मजा वाटायची. भोवऱ्याभोवती गुंडाळलेली दोरी जेवढ्या जास्त जोरात ओढली जाईल तेवढा जास्त वेळ भोवरा फिरायचा. भोवरा फिरण्यालासुद्धा त्याला असलेली आर (टोकदार खिळा) कशी आहे, ती किती आत किंवा बाहेर आहे, तसेच त्याची जाडी किती आहे हेसुद्धा जबाबदार असते. तसाच तो कोणत्या प्रकारच्या पृष्ठ भागावर फिरतोय यावर त्याचे फिरणे अवलंबून असते. त्यामुळे तो जोरात फिरला तरी काही वेळा एका जागेवर स्थिर असतो, तर काही वेळा क्षणाक्षणाला जागा बदलतो. तसेच आपल्या स्वत:भोवती फिरताना काही वेळा ईतर गोष्टींभोवतीसुद्धा फिरतो असे लक्षात येते.सगळे भोवरा कसा फिरतो किंवा तो कसा फिरवावा हे सांगण्यासाठी नाही तर आपले आयुष्यसुद्धा या भोवºयासारखेच आहे हे जाणवले म्हणून लिहीत आहे.भोवरा फिरण्यासाठी जशी एका दोरीची गरज असते व ती दोरी भोवºयाभोवती गुंडाळावी लागते त्याशिवाय भोवरा फिरत नाही. तसेच माणसाचेही आहे. माणूस एक भोवरा आहे व तो दिवसभर आपल्याच समस्या सोडवायला फिरत असतो. रात्री अंथरुणावर पडल्यावर मात्र त्याचे त्या दिवसासाठीचे फिरणे थांबते.सकाळी उठल्यापासून वेगवेगळ्या गोष्टी, समस्या याला तो तोंड देत असतो. अगदी आॅफिस, व्यवसाय या ठिकाणी निघणे, रहदारी, प्रवास साधने, पार्किंग समस्या, मुलांना शाळेत दाखल करण्यापासून त्यांच्या उच्च शिक्षणापर्यंत कसे शिकवावे याचा विचार, तरुण असेल तर नोकरी व व्यवसायाचा भेडसावणारा प्रश्न, थोडे स्थिरावले असतील तर कर्जाने घेतलेले घर, दुचाकी, चारचाकी, टीव्ही, फ्रिज यासारख्या वस्तुंच्या हप्त्यांची पगाराशी किंवा उत्पन्नाशी घातलेली सांगड.परिवारात असलेले कार्यक्रम, आजारपण, ज्येष्ठांचा सांभाळ या करता करावी लागणारी धावपळ. सुट्यांमध्ये बाहेरगावी जाण्याचे ठरविले असेल तर त्यासाठी केलेली आर्थिक तडजोड. याशिवाय बदलीची नोकरी असल्यास ठरावीक काळाने होणारी बदली त्यानंतर परत बसवलेली संसाराची घडी, याशिवाय कामाचे तास, त्या ठिकाणच्या अडचणी, त्रास, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केलेली धावपळ, अंतर्गत स्पर्धा यातही हल्ली नवरा बायको दोघेही काम करणारे असतात. त्यामुळे काही वेळा समस्यांमध्ये वाढ होत असते. या सर्व गोष्टी म्हणजे आपल्याभोवती असलेली व आपल्याला गुंडाळली जाणारी दोरी होय आणि ही दोरी ओढल्या गेल्यावर या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी माणूस भोवºयासारखा सतत आपल्याभोवती फिरत असतो. यातील काही समस्या रोज सुटतात तर रोज पुन्हा नव्याने निर्माण होतात, तर काही सुटण्यास बराच काळ लागतो. त्यातच माणसाचे दिवस, आठवडे, महिने, वर्षे संपत असतात. अशी अनेक वर्षे काढल्यावर जेव्हा तो स्थिरावल्यासारखा वाटतो तेव्हा माणूस नावाच्या भोवºयाची फिरण्याची गती कमी झालेली असते. नंतर तो फिरायचा थांबतो. पण असे थांबल्यानंतर त्याच्या लक्षात येते. या स्वत:सह परिवाराभोवती फिरण्यात त्याच्या आयुष्याची जवळपास ६० वर्षे संपत आलेली आहेत आणि आता तो समस्यांचा दोरीचा जोर कमी झाला म्हणून नाही तर थकलाय म्हणून थांबलाय...-कौस्तुभ परांजपे, जळगाव 

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव