शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षानंतर सोने खरेदीस ‘झळाळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 14:14 IST

सुवर्णनगरी अशी देशभर ख्याती असलेल्या जळगावात नवरात्रोत्सवाच्या काळात सोने खरेदीचा मोठा उत्साह दिसून येत असून दररोज गर्दीमध्ये भर पडत आहे.

ठळक मुद्देसणासुदीसाठी दागिने खरेदीकडे कलफॅन्सी दागिन्यांना मागणीमराठवाडा, विदर्भ या लागून असलेल्या भागातील ग्राहक

जळगाव - सुवर्णनगरी अशी देशभर ख्याती असलेल्या जळगावात नवरात्रोत्सवाच्या काळात सोने खरेदीचा मोठा उत्साह दिसून येत असून दररोज गर्दीमध्ये भर पडत आहे. तब्बल दीड वर्षानंतर सोने खरेदीचा एवढय़ा मोठय़ा प्रमाणात उत्साह दिसून येत असल्याने व्यावसायिकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.  उलाढाल वाढली तर आहेच सोबतच  दस:यासाठी मनाजोगे दागिने मिळावे म्हणून त्यांचे बुकिंगदेखील केले जात आहे. अबकारी कर, सुवर्ण व्यावसायिकांचा संप, नोटाबंदी, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम, जीएसटी अशा वेगवेगळ्य़ा कारणांनी या व्यवसायावर मंदीचे सावट होते. संपामुळे विस्कटलेली घडी पुन्हा बसवित असताना नोटाबंदीच्या फे:यात हा व्यवसायात अडकला व तब्बल सहा महिने त्यातून बाहेर पडू शकला नाही. त्यानंतर पुन्हा जीएसटीमुळे व्यापा:यांसह ग्राहकांमध्येही संभ्रम निर्माण झाल्याने तसेच गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे या व्यवसायात मंदीचे चित्र होते.  मात्र आता नवरात्रोत्सवास सुरुवात होताच सर्व मरगळ दूर झाल्याचे चित्र असून सुवर्ण बाजारात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे दीड वर्षानंतर प्रथमच बाजारात पहिल्यासारखे उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच सोने खरेदीला येथे सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू यात भर पडून गेल्या महिन्याच्या तुलनेत ही उलाढाल दीडपटीने वाढली आहे. 

सणासुदीसाठी दागिणे खरेदीसाठी ग्राहकांचा कल दिसून येत आह़े  नवरात्रात तर मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जातच आहे, सोबतच  दस:याला मनासारखे अलंकार मिळावे म्हणून मोठय़ा प्रमाणात बुकिंगदेखील केले जात आहे. यासाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद असल्याचे विक्रेत्यांनीही सांगितले. सुरक्षित गुंतवणूक असल्याने ग्राहकांचा यावरील विश्वासअजूनही कायम असल्याचे चित्र आहे.पारंपारिक दागिन्यांसह फॅन्सी दागिने, टेम्पल ज्वेलरी व त्यातल्या त्यात लहान आकाराच्या दागिन्यांना जास्त मागणी आहे तर  हौस म्हणून मोठेही दागिनेही खरेदी केले जात आहे.  

सुवर्णनगरीतील दागिने देशभरातजळगाव जिल्ह्यातील ग्राहक तर येतच आहे सोबत मराठवाडा, विदर्भ या लागून असलेल्या भागातील ग्राहक येथे येत असल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे येथील दागिने देशभरातही पोहोचत असून जळगावात नातेवाईकांकडे आलेली राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात व इतर भागातील मंडळी येथून सोने खरेदी करून नेत असते. अशा ग्राहकांचीही मागणी वाढणार असल्याचे जाणकारांनी सांगितले. सोन्यासह चांदीच्या दागिन्यांमध्ये हातातील कडे, गोट, पाटली, बांगडी, गोखरु, हाताचे वाळे या अलंकारांनाही मागणी आहे. 

नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीपासून सोने खरेदीसाठी चांगली ग्राहकी सुरू झाली आहे. सोबतच दस:यासाठी बुकिंगदेखील केले जात आहे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. - मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, आर.सी. बाफना ज्वेलर्स, जळगाव.