शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

भुसावळ येथे गोगा नवमीनिमित्त छडी मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:41 IST

दुचाकी रॅलीचे स्वागत

भुसावळ, जि.जळगाव : वीर गोगादेव चौहाण यांच्या जयंती उत्सवानिमित्त शहरातील वाल्मीक नगरापासून मंगळवारी सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली तर सायंकाळी छडी मिरवणूक काढण्यात आली. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते छडीचे पूजन केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. भगतांसह उस्ताद खलिपा, मैल मुक्तीयार, टिकायती यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.यंदा १३ छड्यांंची एकाच वेळी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपाचे सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगरसेवक किरण कोलते, पुरूषोत्तम नारखेडे, माजी नगरसेवक संतोष बारसे, अर्जुन खरारे आदी उपस्थित होते. बाजारपेठचे नूतन निरीक्षक प्रदीप पवार, सहाय्यक निरीक्षक मनोज पवार यांच्यासह युवा नेतृत्व व माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनीही छडीचे पूजन केले. प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.आठवडे बाजार, डेली मार्केट, सराफ बाजार, मॉडर्न रोड, जुनी नगरपालिका, रेल्वे स्थानक, बसस्थानक, बाजारपेठ पोलीस ठाणेमार्गे ही रॅली पुन्हा मूळ जागी पोहोचली. नगरसेवक पिंटू कोठरी व नगरसेवक अ‍ॅड.बोधराज चौधरी यांनी झेंडी दाखवल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत माजी नगरसेवक संतोष बारसे, उत्सव समितीचे अध्यक्ष अमित खरारे, अर्जुन खरारे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.गोगादेव जयंतीनिमित्त आठवडे बाजार नृसिंह मंदिराजवळ जहारवीर गोगादेव यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. प्रसंगी उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, पप्पू बारसे, माजी नगरसेवक संतोष बारसे, युवा नेते धीरज बारसे, भाजपा शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, नगरसेवक रमेश नागराणी, लल्ला देवकर, सुनील पवार यांच्याहस्तेही पूजन करण्यात आले. याप्रसंगी लाडूंचा प्रसाद वाटप करण्यात आला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBhusawalभुसावळ