शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सदैव जमिनीवर पाय असणारा देवमाणूस : ना. गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:13 IST

ना. गुलाबराव पाटील म्हणजे संघर्षाच्या धगधगत्या अग्निकुंडातून तावूनसुलाखून निघालेला तेजस्वी हिरा. अगणित विषारी काट्यांचा त्रास सोसून सर्वार्थाने नावाप्रमाणेच फुललेले, ...

ना. गुलाबराव पाटील म्हणजे संघर्षाच्या धगधगत्या अग्निकुंडातून तावूनसुलाखून निघालेला तेजस्वी हिरा. अगणित विषारी काट्यांचा त्रास सोसून सर्वार्थाने नावाप्रमाणेच फुललेले, जनसामान्यांच्या आयुष्यात आनंदाचा सुवास फुलविणारे देवदूतरूपी गुलाबपुष्प! अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे असणाऱ्या या व्यक्तित्वाचा प्रवास मात्र अगणीत काट्यांनी भरलेला आणि तेवढाच अचंबित आणि थक्क करणारा आहे. एखाद्या प्रेरणादायी चित्रपटाच्या कथानायकाला साजेसा, साधा कार्यकर्ता ते मंत्रिपदापर्यंतचा गुलाबराव पाटील यांचा जीवन प्रवास बघितल्यावर निश्‍चितच या व्यक्तीबद्दलचा आदर अधिकच द्विगुणित होतो.

५ जून रोजी ‘लाडली’ या छोट्याशा खेड्यात या संघर्षयोद्धाचा जन्म झाला. खरं तर संघर्ष हा तसा गुलाबभाऊंच्या पाचवीलाच पुजलेला म्हणावा लागेल. भाऊ सहा महिन्यांचे असतानाच त्यांचे मातृछत्र हरपले. त्यानंतर मावशींच्या छत्रछायेत लहानाचे मोठे होत त्यांचा जीवनप्रवास सुरू झाला. सर्वसाधारण परिस्थिती असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी ‘नशीब’ पान सेंटर सुरू केले असताना आपल्या कर्तृत्वशैलीच्या जोरावर सर्वार्थाने त्यांचे राजकीय नशीब उदयाला यायला सुरुवात झाली.

भाऊ हे १९८५ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत कार्यरत झाले. याच कालावधीत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आक्रमकपणे आवाज उठविला. विविध आंदोलनांमुळे गुलाबराव पाटील हे नाव जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रभर गाजायला सुरुवात झाली आणि तेथूनच आंदोलनाच्या तालमीतून या लोकनेत्याच्या तेजस्वी राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. सामान्य कार्यकर्ता ते मंत्री असा प्रवास त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने आणि सर्वसामान्यांच्या सहकार्याने केला असून, आजही ही वाटचाल अविरतपणे सुरू आहे.

-ह.भ.प. गजानन महाराज, वरसाडेकर, अध्यक्ष, मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन समिती, जि.जळगाव