शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:15 IST

सावदा, ता. रावेर : भावविभोर अंतःकरणाने वारकऱ्यांनी भगवान श्रीविठ्ठलाचा निरोप घेत पुढची वारी पायीच होऊ दे, कोरोनाचे संकट ...

सावदा, ता. रावेर : भावविभोर अंतःकरणाने वारकऱ्यांनी भगवान श्रीविठ्ठलाचा निरोप घेत पुढची वारी पायीच होऊ दे, कोरोनाचे संकट घालव अशी आर्त विनवणी केली. परतवारीकरिता मुक्ताईनगरकडे शनिवारी दुपारी २ वाजता प्रस्थान केले. रविवारी सकाळी ९ वाजता नवीन मुक्ताबाई मंदिर येथे पालखी सोहळा आगमन होईल.

पंढरपूर येथून निघण्यापूर्वी पहाटे काकड आरती लवकर आटोपून गोपाळपूर येथे काल्यासाठी मुक्ताबाई दिंडी सोहळा दाखल झाला. तेथे गोपाळपूर सरपंच विलास मस्के, गोपालकृष्ण मंदिर अध्यक्ष दिलीप गुरव ,पंढरपूर तहसीलदार सुशीलकुमार बल्व्हे यांनी स्वागत केले. ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांचे काल्याचे कीर्तन झाले.

तदनंतर परिक्रमा करून पालखी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आली असता समितीचे अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर, विश्वस्त ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ॲड. माधवी निगडे, प्रशासकीय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी श्री संत मुक्ताबाई पादुकांचे पूजन केले. मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष रवींद्र पाटील, विणेकरी रतिराम महाराज शास्त्री, रवींद्र महाराज हरणे, पंजाबराव पाटील, शंकरराव पाटील, निळकंठराव पाटील यांचा सन्मान केला. त्यानंतर मुक्ताबाई व विठ्ठल-रुक्मिणी भेट सोहळा झाला. वारीसोबत आलेल्या सर्व वारकरी, कर्मचारी यांनी शांततेत विठ्ठल दर्शन घेतले. दुपारी मुक्ताई मठात परतवारीचे अभंगांचे भजनात सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पालखी पूजन आरती केली. सोपानकाका पालखी सोहळ्याचे ह.भ.फ.त्रिगुणमहाराज गोसावी यांचे हस्ते पादुका बसमध्ये आसनस्थ करून परतवारी प्रवास सुरू झाला. चंद्रभागा तीरावर आरती पसायदान करून वारीचा समारोप झाला. जालना‌ येथे संध्याकाळी मुक्काम करून रविवारी सकाळी ९ वाजता पालखी सोहळा मुक्ताईनगर येथे नवीन मंदिरात पोहोचेल.

ठळक क्षण

पंढरीनाथाचे‌ निरोपाचे अभंग व भजन गात असतांना वारकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.

पाळपूर येथे संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याला काल्याच्या कीर्तन करण्यात येणाऱ्या ठिकाणी मुक्ताबाई पालखी तळ ओटा बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

बरेच दिवसांपासून आईसाहेब सोहळ्यासोबत पायी वारी करण्याची इच्छा होती. सद्गुरू दिगंबर महाराज चिनावलकर यांच्या दिंडी परंपरेची जबाबदारी असल्याने वेळेचे नियोजन जमत नव्हते. अखेर कोरोनामुळे आईसाहेब मुक्ताबाईसोबत बसने का होईना वारीचा योग आला. अनंत जन्माची पुण्याई फळाला आली.

- नरेंद्र नारखेडे, अध्यक्ष, सद्गुरू दिगंबर महाराज चिनावलकर दिंडी परंपरा