पारोळा : येथील प्राजक्त फाउंडेशनच्या वतीने समाजात उल्लेखनीय काम करण्याऱ्या समाजसेवकांचा सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.माजी नगराध्यक्ष व उद्योगपती गोविंद एकनाथ शिरोळे, जळगाव आकाशवाणीच्या उद्घोषिका स्मिता दीक्षित, जिल्हा कृषी अधिकारी अनिल भोकरे, जळगाव येथील गजानन मालपुरे, रथ कारागीर शालिग्राम लोहार, प्रांजल बोरसे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. वयाच्या १०४ व्या वर्षी ८० वेळा एकादशी वारी करणारे वारकरी बाबू मुसळे यांचाही विशेष गौरव करण्यात आला. प्राजक्त फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित गणेश मंडळ आरास स्पर्धेमधील यशस्वी गणेश मंडळांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी गायत्री बधान व प्रणव पाखले या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अशोक वाणी, स.ध.भावसार, केशव क्षत्रिय, पी.एन.पुरकर, बापू वाणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन पंकज भावसार यांनी केले तर आभार बंडू वाणी यांनी मानले.
पारोळा येथे समाजसेवकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 17:48 IST