शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

पंढरीची सायकल वारी करणाऱ्या चाळीसगावकर वारकऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 16:07 IST

वारी हे सामूहिक भक्तीचे प्रतीक- आमदार मंगेश चव्हाण यांचा भावस्पर्शी संवाद

चाळीसगाव  : पंढरपुरची वारी हे सामुहिक भक्तिचे पृथ्वीतलावरील दूर्मिळ उदाहरण असून माझ्याही परिवारात गेल्या ६० वर्षात पायी वारीचा प्रघात कधी चुकला नाही. दोन वर्षापूर्वी याच भक्ति धाग्याला जोडत २३०० नागरिकांना स्वखर्चाने पंढरीची वारी घडवली. सायकलवर वारी करणा-या वारक-यांनी चाळीसगावच्या मातीतील भक्ति परंपरेची पताका थेट भूवैकुंठी फडवली आहे. याचा अभिमान वाटतो, असा भावस्पर्शी संवाद आमदार मंगेश चव्हाण यांनी येथे साधला.सोमवारी त्यांच्या हस्ते शिवनेरी या त्यांच्या निवासस्थानी चाळीसगाव ते पंढरपुर - अक्कलकोट - तुळजापुर या तीर्थस्थळांची एक हजार २० किमी परतीच्या प्रवासासह सायकलवारी करणा-या हौशी सायकलविरांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी सायकलविरांचे औक्षण केले. विठूराया व रुख्मिणी मातेची मुर्ती भेट देऊन सायकल वारक-यांचा सन्मान केला गेला.पुढे बोलतांना चव्हाण म्हणाले की, वारीत गरीब - श्रीमंत हा भेद गळून पडतो. मुखातून विठूरायाचा गजर होत असतांना अंगात पांडुरंगाला पाहण्यासाठी प्रत्येक पावलागणिक नवे बळ संचारत असते. पायी वारीचा अनुभव माझ्याही गाठीशी आहे. यंदा कोरोनामुळे पायी वारी बंद असल्याने सायकलविरांचे म्हणूनच कौतुक वाटते. यंदाही आषाढी एकादशीच्या पर्वणीवर आॕनलाईन अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन केले होते. यालाही जोरदार प्रतिसाद मिळाला. सायकलवारीची ही परंपरा पुढेही सुरुच रहावी. यासाठी आपले नेहमी सहकार्य राहील. असेही त्यांनी अश्वासित केले. शिवनेरी फाऊंडेशनने नेहमीच विज्ञान - अध्यात्म यांची योग्य सांगड घालून उपक्रम राबविले आहे. सायकलवर पंढरपुरची वारी करणे, हे साहसाचे काम आहे. म्हणूनच सायकलवीर वेगळे ठरतात. असे प्रतिपादन प्रतिभा चव्हाण यांनी केले.यावेळी भास्कर पाटील, योगेश खंडेलवाल, जगदिश चव्हाण, मनोज गोसावी आदि उपस्थित होते......यांचा झाला गौरवचाळीसगाव ते पंढरपुर - अक्कलकोट - तुळजापुर ही एक हजार २० किमीची सायकलवारी करणारे टोनी पंजाबी, कवी व पत्रकार जिजाबराव वाघ, रवींद्र पाटील, अरुण महाजन, सोपान चौधरी, लिलाधर पाटील यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी पांडुरंगाचा जयघोष करीत गजरही केला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमChalisgaonचाळीसगाव