शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील लांडोरखोरी उद्यानाला दररोज 300 नागरिक देतात भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 12:03 IST

सुट्टीच्या दिवशी होतेय गर्दी : दररोज किमान 5 हजाराची तिकीट विक्री

ठळक मुद्देस्वास्थ संकल्पनेचाही अंतर्भाववेळ वाढविल्यास या उद्यानाला आणखी प्रतिसाद मिळू शकेल

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13 - शहरातील मोहाडी रस्त्यालगत 70 हेक्टरवर  पसरलेल्या लांडोरखोरीच्या निसर्गरम्य वनापैकी 12 हेक्टर जमिनीवर उभारलेल्या लांडोरखोरी उद्यानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून ते नागरिकांना खुले करण्यात आल्यानंतर त्यास नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. आतार्पयत 36 लोकांनी वार्षिक पास काढले आहेत. या उद्यानाच्या उद्घाटनास 14 सप्टेंबर रोजी महिना पूर्ण होत आहे. त्यापाश्र्वभूमीवर ‘लोकमत’ने आढावा घेतला असता, ही माहिती मिळाली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खाद्य पदार्थ, अपूर्ण असलेला ट्रॅक पूर्ण झाल्यास आणखी चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असा सूरही उमटत आहे.सकाळ व संध्याकाळ मिळून 5 ते 7 हजारांचे उत्पन्न तिकीट विक्रीतून येत आहे. म्हणजेच सुमारे 250 ते 300 लोक दोन्हीवेळ मिळून भेट देतात. त्यात लहान मुलांचाही समावेश असतो. सुटीच्या दिवशी मात्र हीच संख्या 1 हजारार्पयत जाते. 10 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने सकाळ व संध्याकाळ मिळून तिकीट विक्रीतून सुमारे 10 हजार रूपयांचे उत्पन्न वनविभागाला मिळाल्याची माहिती मिळाली. या उद्यानाचे काम पूर्ण झाल्यानंतर वनमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने या उद्यानाचे उद्घाटन झाले नव्हते, त्यामुळे ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले नव्हते. त्यामुळे शहरवासी व वन्यप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत होती. याबाबत ‘लोकमत’ ने आवाज उठविल्यानंतर त्याची दखल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली होती व 14 ऑगस्ट रोजी या उद्यानाचे त्यांनी उद्घाटन केले होते व नागरिकांसाठी हे उद्यान खुले केले होते. स्वास्थ संकल्पनेचाही या उद्यानाच्या निर्मितीत अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळेच मॉर्निग वॉक व जॉगिंगसाठी मातीचा ट्रॅक करण्यात आला आहे. तसेच निसर्गाच्या सान्निध्यातच खुल्या व्यायामशाळेचा (ओपन जीम) लाभही नागरिकांना घेता येत असल्याने नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे.उद्यानाची वेळ सकाळी 5 ते 9.30 व दुपारी 4.30 ते सायंकाळी 6.30 र्पयतच आहे. मात्र बहुतांश नागरिक हे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास फिरायला निघतात. त्यामुळे त्यांना या ठिकाणी जाणे शक्य होत नाही. मात्र सुटीच्या दिवशी जर दुपारच्यावेळी तसेच सायंकाळी आणखी तासभर वेळ वाढविल्यास या उद्यानाला आणखी प्रतिसाद मिळू शकेल.