जळगाव : पर्यावरण रक्षण आणि समाजसेवा या उद्देशाने आनंद पब्लिकेशनतर्फे येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये ‘रद्दी द्या नव्या को:या नेचर फ्रेंडली वह्या घ्या’ ही अभिनव योजना राबविण्याची मागणी जितेंद्र कोठारी यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंकडे केली. चावलखेडा येथील नीळकंठेश्वर शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी ते जिल्हा दौ:यावर आले असता त्यांना या अभिनव उपक्रमाबाबत माहिती दिली. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि सकारात्मक विचार करून योजना राज्यभर राबविण्याचे आश्वासन दिले आहे. या योजनेअंतर्गत रद्दीच्या मोबदल्यात दर्जेदार आनंद नोटबुक्स विद्याथ्र्याना दिल्या जाणार असून कुठलाही आर्थिक व्यवहार होणार नाही. फक्त रद्दीच्या मोबदल्यात दर्जेदार वह्या हीच देवाण घेवाण असेल. या उपक्रमाअंतर्गत देण्यात येणा:या वह्या 100 टक्के पर्यावरणपूरक असून पुनर्निर्मित केलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला अनुरूप ही योजना आहे. शिक्षण विभागातर्फे राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यासाठी शासकीय आदेश काढण्याची मागणी कोठारी यांनी केली. तसेच दिल्या जाणा:या वह्यांवर शिक्षण विभाग काही संदेश विद्याथ्र्याना देऊ इच्छित असेल तर तो छापील स्वरूपात वह्यांवर प्रसिद्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
रद्दी द्या, नव्या को:या वह्या घ्या
By admin | Updated: December 31, 2015 01:10 IST