शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित सिलिंडर फक्त नऊच द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:28 IST

दिलीप चौबे यांची जनहित याचिका : केंद्र व राज्य शासनासह ३ तेल कंपन्यांना नोटीस

ठळक मुद्देअनुदानित सिलिंडरचा गैरवापर होत असल्याने याचिकासिलिंडरची संख्या १२ वरून ९ करावीआणखी कागदपत्र सादर करण्यासाठी मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : भारतीय कुटुंबांना वर्षभरात सरासरी १०० किलो गॅस पुरेसा असताना सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला १२ अनुदानित सिलिंडर दिले जात आहेत. त्यामुळे या अतिरिक्त अनुदानित सिलिंडरचा गैरवापर होत असून देशाचे दरवर्षी सुमारे ३०० कोटींचे नुकसान होत आहे. त्यामुळे अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या १२ वरून ९ करावी अशी जनहित याचिका येथील रेखा गॅस एजन्सीचे संचालक दिलीप चौबे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केली आहे.न्यायालयाने ही जनहित याचिका दाखल करून घेत केंद्र, राज्य सरकार तसेच तिन्ही आॅईल कंपन्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी ४ सप्टेंबर रोजी होणार आहे.चौबे यांनी या याचिकेत अनुदानित गॅस सिलिंडरचा गैरवापर करताना झालेल्या दुर्घटनांचे वृत्तपत्रात प्रसिद्ध वृत्तांची कात्रणे तसेच इतरही अनेक कागदपत्र जोडली आहे. न्यायालयाने चौबे यांना आणखी कागदपत्र सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.का केली याचिका?दिलीप चौबे यांनी सांगितले की, जिथे ६ किंवा ९ गॅस सिलिंडरचीच आवश्यकता आहे, त्या ठिकाणी प्रती कुटुंब वर्षाला १२ अनुदानित गॅस सिलिंडर पुरविले जात आहेत. त्यात प्रती सिलिंडर दिल्या जात असलेल्या सबसिडीचा गैरवापर होत आहे. आवश्यकता नसलेले अनुदानित गॅस सिलिंडर लाभार्थीकडून बाजारात विकले जात असून त्यामुळे देशाचे सुमारे ३०० कोटींचे दरवर्षी नुकसान होत आहे. तर या काळ्याबाजारात विक्री झालेल्या गॅस सिलिंडरमधील गॅस कार, रिक्षा आदी वाहनांमध्ये केला जातो. घरीच हा गॅस चोरून भरण्याचा प्रकार होतो. विशेषत: झोपडपट्टी भागातच हे प्रकार होतात. अशा ठिकाणी संपूर्ण झोपडपट्टीचे नुकसान होते. तसेच अनेकदा जीवितहानीही होते. आधीच्या पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारच्या काळात केवळ ६ अनुदानित गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय झाला होता. मात्र राजकीय नुकसान टाळण्यासाठी त्याची अंमलबजावणी टाळली गेली. त्यानंतर १२ अनुदानित गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ही संख्याही गरजेपेक्षा अधिक आहे. मात्र आताच्या राष्टÑीय लोकशाही आघाडीने (रालोआ) (भाजपा) सरकारने याबाबत काहीही केले नाही. वास्तविक पंतप्रधानांकडून गरिबांना मोफत गॅस कनेक्शन पुरवता यावेत, यासाठी गॅसवरील सबसिडी सोडून देण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र अनुदानित गॅस सिलिंडरचा गैरवापर रोखण्यासाठी काहीही कार्यवाही केली जात नाही. याबाबत दिलीप चौबे यांनी प्रशासनाकडे तसेच शासनाकडे गेल्या ५-६ वर्षांपासून पाठपुरावा केला. मात्र काहीही दखल घेतली जात नसल्याने अखेर त्यांनी अ‍ॅड.एम.एम. भोकरीकर यांच्या माध्यमातून औरंगाबाद जनहित याचिका दाखल केली आहे.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चौबे यांनी या याचिकेत प्रतिवादी केलेल्या केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्रालयाचे सचिव, राज्य शासनाच्या गृह तसेच जीवनावश्यक वस्तू व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांना नोटीस बजावण्यात येणार आहे. न्यायालयाने केंद्र व राज्य शासनाला अनुदानित एलपीजी गॅसचा गैरवापर, नासाडी थांबविण्यासाठी नियम, मार्गदर्शिका, धोरण ठरविण्याचे आदेश द्यावेत.अनुदानित गॅसच्या गैरवापरास प्रतिबंध करून अपघात व आर्थिक नुकसान टाळण्याचे प्रयत्न करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत.अनुदानित गॅस सिलिंडरचा घरगुती वापरासाठी आवश्यक तेवढाच पुरवठा करण्याबाबतही आदेश द्यावेत.अनुदानित गॅसच्या गैरवापरामुळे पर्यावरणाची होणारी हानी, तसेच देशाच्या विकासावर होणार विपरीत परिणाम थांबविण्याचे आदेश द्यावेत.