शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भाषिक कौशल्ये विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना द्यावी सर्जनशीलतेची संधी -सविता वायळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:12 IST

पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून क्षमता किंबहुना भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेची संधी द्यावी, असे आवाहन बालभारतीच्या मराठी विशेषाधिकारी सविता वायळ यांनी केले.

ठळक मुद्देमराठी विशेषाधिकारी सविता वायळ यांचे आवाहन आॅनलाईन संवाद सत्राच्या समारोपात शिक्षक, पालकांसह विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

भुसावळ : वर्ग आणि वयानुसार विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात घेऊन त्यांची भाषिक कौशल्य विकसित होण्यासाठी पाठ्यपुस्तकाची रचना करण्यात आली आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून क्षमता किंबहुना भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेची संधी द्यावी, असे आवाहन बालभारतीच्या मराठी विशेषाधिकारी सविता वायळ यांनी केले.जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे आयोजित लेखक-कवींशी आॅनलाईन संवादसत्राच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.प्रारंभी बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांनी आॅनलाईन संवाद सत्रात पार पडलेल्या एकूण बारा लेखक-कवींसह दोन संवाद सत्र अशा १४ सत्रांचा थोडक्यात आढावा घेतला आणि वायळ यांचा परिचय करून दिला. त्यानंतर वायळ म्हणाल्या की, सध्या कोरोनाचे जागतिक संकट आहे. तरीसुद्धा शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यात समन्वय साधून पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी यांच्यापर्यंत पोहोचण्याचा स्तुत्य उपक्रम डॉ.जगदीश पाटील यांनी राबवला. शाळा कधी सुरू होतील हे सांगता येत नसले तरी शिक्षकांनी आधीपासूनच आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे सुरू केले आहे. शाळा बंद असली तरी शिक्षण मात्र सुरू राहील यासाठी शिक्षक धडपडत आहेत. सध्या विद्यार्थी घरी असल्याने पालकांची जबाबदारी वाढली आहे. त्यांनीसुद्धा पाठ्यपुस्तके हाताळून मुलांशी चर्चा करावी आणि त्यांच्याशी संवाद साधावा. तसेच विद्यार्थ्यांनी संकट हीच संधी समजून संकटाकडे नकारात्मक भूमिकेने न पाहता सकारात्मकतेने पाहावे, असे आवाहनही वायळ यांनी केले. याचबरोबर त्यांनी पाठ्यपुस्तक निर्मितीमागची भूमिका, पाठ्यपुस्तक निर्मिती करतानाचा अनुभव आणि पाठ्यपुस्तक हातात आल्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया याविषयी माहिती दिली. त्यानंतर डॉ.माधुरी जोशी नागपूर, जळगाव डायटचे अधिव्याख्याता प्रा.शैलेश पाटील, सुनीता गोळे मुंबई, पी.एस. पाटील जामठी, दीपक चौधरी बोदवड, मनीषा भटकर यावल यांनी मनोगत व्यक्त केले.एकूण १५ आॅनलाईन संवाद सत्र - डॉ.सुनील विभुते, डॉ.महेंद्र कदम, ज.वि. पवार, वीरा राठोड, डॉ.नीलिमा गुंडी, डॉ.शिरीष गोपाळ देशपांडे, आसावरी काकडे, डॉ.विजया वाड, अरविंद जगताप, नीरजा, द. भा.धामणस्कर, सुप्रिया खोत, डॉ.दीपाली पूर्णपात्रे, चारूदत्त आफळे महाराज, सविता वायळ या वक्त्यांनी आॅनलाईन संवाद साधला. त्याचा लाभ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी घेतला.

टॅग्स :literatureसाहित्यBhusawalभुसावळ