शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
4
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
5
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
6
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
7
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
10
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
11
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
12
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
13
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
14
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
15
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
16
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
17
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
18
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
19
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
20
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?

हक्काचा निवारा द्या, मगच घरकुलाबाहेर काढा

By admin | Updated: March 18, 2017 00:21 IST

गोरगरिबांच्या संतप्त भावना : पालिकेत घरकूलप्रश्नी बैठक, निर्णयाचा चेंडू नागरिकांच्या हातात

भुसावळ : पालिकेच्या घरकुलातून बाहेर काढण्यापूर्वी हक्काचा निवारा द्या; मगच बाहेर काढा, असा संतप्त इशारा देत महिलांसह नागरिकांनी  प्रशासन व सत्ताधा:यांपुढे व्यथा मांडल्या़ गेल्या 15 वर्षापासून धूळखात असलेल्या घरकुलाकडे कुणाचेही लक्ष नसताना गरीब रहायला आल्यानंतरच प्रशासनाचा पोटशूळ का? असा अंतमरुख करणारा सवाल उपस्थित करतानाच धनदांडग्यांचे अतिक्रमण काढण्याचे सर्वोच्च न्यायालयासह खंडपीठाचे आदेश असताना त्याची अंमलबजावणी होत नाही मात्र दुसरीकडे गोरगरिबांचे छत डोक्यावरून काढण्याचा प्रयत्न होत असल्याच्या कृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला़सव्र्हे क्रमांक 297 वर उभारण्यात आलेल्या घरकुलांचा नागरिकांनी अनधिकृतरित्या ताबा मिळवल्यानंतर प्रशासन व नागरिकांमध्ये पेच निर्माण झाला आह़े कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी संबंधिताच्या भूमिका जाणून घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी चार वाजता पालिका सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आल़े तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत कुठलेही फलित निघाले नाही, मात्र निर्णय काय घ्यायचा आहे तो तुम्हीच घ्या, असे सांगून संबंधितांकडे निर्णयाचा चेंडू टोलवण्यात आला़व्यासपीठावर नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी बी़टी़ बाविस्कर, गटनेता मुन्ना तेली, किरण कोलते, पुरुषोत्तम नारखेडे, वसंत पाटील, रवींद्र खरात, प्रा.दिनेश राठी, जगन सोनवणे, अॅड़ बोधराज चौधरी, मुकेश गुंजाळ, दुर्गेश ठाकूर, निक्की बत्रा, देवेंद्र वाणी, महेंद्रसिंग ठाकूर आदींची उपस्थिती होती़ याप्रसंगी मुन्ना सोनवणे म्हणाले की, ज्यांनी तुम्हाला निवडून दिले किमान त्यांना सहकार्य करा़ अनेक दिवसांपासून घरकुलाचा गोंधळ सुरू आह़े बाजारपेठचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे व सहका:यांनी प्रसंगी चोख बंदोबस्त राखला़ धनदांडग्यांचे अतिक्रमण तोडा, मगच गरिबांना बाहेर काढा4उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही जनता गॅलरीचे सुभाष नरगुणकर, गुरुदीप व जुड डिसुजा यांचे अतिक्रमण मुख्याधिकारी का तोडत नाही? असा संतप्त सवाल माजी नगरसेवक जगन सोनवणे यांनी उपस्थित केला़ उपस्थित सभागृहात त्यांनी न्यायालयीन निर्णयाची प्रतही दाखवली़ आधी धनदांडग्यांचे अतिक्रमण तोडा मगच गरिबांना घराबाहेर काढा, अशी भूमिका त्यांनी मांडली़ गरिबांना घरकूल मिळाले नाही तर उद्यापासून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला़मग तहसीलदारांविरुद्धच गुन्हा दाखल करायचा का ?4गोरगरिबांना पालिकेच्या घरकुलात राहू देण्यासाठी तहसीलदारांनी आदेश दिले होते, मात्र आपल्याला तहसीलदारांचे आदेश मान्य नाहीत, अशी भूमिका मुख्याधिका:यांनी मांडल्यानंतर नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी संतप्त भावना व्यक्त करीत मग तहसीलदारांवर गुन्हा दाखल करायचा का?असा प्रश्न केला़सांगा, आम्ही रहायचे कुठे4भांडे घासून हातावर पोट भरतो, रहायला घर नाही, घरकुलातूनही बाहेर काढल्यास आम्ही रहायचे कुठे!-राजकुमार ठाकूर/बिजानबी शेख खाटीक15 वर्षापासून घरकूल पडून4तब्बल 15 वर्षापासन घरकूल पडून असताना पालिकेने कुठलीही दखल घेतली नाही़ गरीब आहोत, कुठलीही नोकरी नाही, हातमजुरीवर पोट भरतो़ घरकुलात आल्याने मेंटेनन्स होत आह़े-वैशाली कर्डेवडिलांना पॅरालिसीस, बहीण अपंग4वडिलांना पॅरालिसीस झाला आहे, बहीण अपंग आह़े अशा परिस्थितीत आम्ही जायचे कुठे? आधी रेल्वे उत्तर वॉर्डात रहायचो मात्र तेथे निवारा नसल्याने येथे आला आहोत़-आनंदा महालेसुविधादेखील नाहीत4रेल्वे उत्तर वॉर्डातील रहिवासी आहोत़ घरकुलात कुठल्याही सुविधा नाहीत़ पाण्यासह लाईटसाठी नगरसेवक रवींद्र खरात यांना बोलावले होत़े पालिकेने  तेथे राहू देण्यास परवानगी द्यावी़-चंद्रमणीपोटावर पाय का ठेवता415 वर्ष घरकूल पडून होते, तेव्हा तुम्ही काय केल़े गरीब लोकांना बाहेर का काढता? पालिकेने साधे ढुंकूनही पाहिले नाही़ आमच्यामुळे निवडून आले, मात्र गरिबांच्या पोटावर पाय का ठेवता?-प्रकाश मोरेपंतप्रधान योजनेचा लाभ घ्यावा : रमण भोळे4पंतप्रधान आवास योजनेचा लाभार्थीनी लाभ घ्या़ 51 शहरात भुसावळची निवड असून लाभार्थीला साडेतीन लाख रुपये अनुदान मिळणार आहे, असे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाल़े चार स्तरांमध्ये सव्र्हे केला जाईल़ काही दिवस घरकुलात राहता येईल, मात्र कायदेशीर कारवाई करणे क्रमप्राप्त आह़े रेणुकामाता मंदिराची जमीन देता येईल : लोणारी4लॉटरी पद्धतीने ड्रॉ काढून दारिद्रय़ रेषेखालील निकषात बसणा:यांना घरकूल वाटप करण्यात येणार आह़े पालिका व सत्ताधा:यांना नियमाबाहेर जाता येणार नाही, जिल्हाधिकारी याबाबत निर्णय घेतील, असे सांगत उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी रेणुका माता मंदिराच्या जमिनीचा पर्याय सूचवला़ घरकुलातील नागरिकांवर सोपवला निर्णय4अनधिकृतरित्या घरकुलात राहणा:या नागरिकांनी काय तो योग्य निर्णय घ्यावा, असा सूर पालिकेच्या बैठकीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिका:यांच्या बोलण्यातून उमटला़ त्यामुळे पुढील निर्णयाकडे लक्ष लागून आह़े अतिक्रमण काढण्यावर पालिका प्रशासन मात्र ठाम आह़े