शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांना पदोन्नतीत पुन्हा आरक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य सरकारने पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आरक्षण सरकारने लागू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य सरकारने पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आरक्षण सरकारने लागू करावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. याविषयी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनदेखील दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, ‘शासनाने मागासवर्गीय पदोन्नतीत आरक्षण हटवण्याचे परिपत्रक काढून पदोन्नतीच्या ३३ टक्के रिक्त पदांवर सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय बेकायदेशीर असून मागासवर्गीयांवर अन्याय करणारा आहे. त्याबाबतची याचिका अद्याप प्रलंबित आहे. तसेच केंद्र सरकारच्या डीओपीटी विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागासवर्गीयांना पदोन्नती देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. शासनाच्या ७ मेच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण देण्याची मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी आरपीआयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे, महानगर कार्याध्यक्ष सागर सपकाळे, उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, नरेंद्र मोरे, रोहित गायकवाड उपस्थित होते.

रणदीप हुड्डावर गुन्हा दाखल करा

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या रणदीप हुड्डा याच्याविरोधात दलित अन्याय व अत्याचार कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली आहे.