शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना कॅरीआॅन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 15:31 IST

महाराष्टÑ सार्वजनिक विद्यापीठ  कायद्याने  कुलगुरुंना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्या विशेषाधिकाराचा वापर करून  कुलगुरुंनी उमवि संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकणाºया जून्या व नव्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकारिता ‘कॅरीआॅन’  देण्यात यावे अशी मागणी राष्टÑीय विद्यार्थी कॉँग्रेसच्या (एनएसयुआय) वतीने करण्यात आली असून, या मागणीसाठी बुधवारी उमविच्या मुख्य इमारतीसमोर ‘एनएसयुआय’च्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन  केले. 

ठळक मुद्दे ‘एनएसयु’ची मागणी उमवित आंदोलन २५ रोजी ‘कॅरीआॅन’बाबत  निर्णय घेवू : उमविचे आश्वासन

आॅनलाईन लोकमत,

जळगाव-दि.१३,महाराष्टÑ सार्वजनिक विद्यापीठ  कायद्याने  कुलगुरुंना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्या विशेषाधिकाराचा वापर करून  कुलगुरुंनी उमवि संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकणाºया जून्या व नव्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकारिता ‘कॅरीआॅन’  देण्यात यावे अशी मागणी राष्टÑीय विद्यार्थी कॉँग्रेसच्या (एनएसयुआय) वतीने करण्यात आली असून, या मागणीसाठी बुधवारी उमविच्या मुख्य इमारतीसमोर ‘एनएसयुआय’च्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन  केले. 

अभियांत्रिकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी हे तीसºया वर्षाचे विषय उत्तीर्ण झाले आहेत. मात्र दुसºया वर्षाच्या  एका विषयात नापास  झाल्याने विद्यार्थ्यांना  चौथ्या वर्षाला प्रवेश  घेता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान होत असल्याने एनएसयुआय कडून  हे आंदोलन करण्यात आले.  एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दुपारी १२ वाजता शेकडो विद्यार्थ्यांनी उमवि परिसर ‘वुई वॉन्ट कॅरीआॅन’ च्या घोषणांनी दणाणून सोडला होता. 

नांदेड विद्यापीठाने केले तर उमविला काय अडचण ?एनएसयुआयच्या काही विद्यार्थ्यांनी प्रभारी कुलसचिव  प्रा.ए.बी.चौधरी यांची  भेट घेतली. नांदेड विद्यापीठाचे कुलगुरु यांनी आपल्या विशेषाधिकार वापरून विद्यापीठातील संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये  कॅरीआॅन सुरु केले असून,  उमवि प्रशासनाला काय अडचणण असा प्रश्न विद्यार्थ्यांनी  उपस्थित केला. तसेच याबाबत अनेकवेळा उमविचे  परीक्षा विभागाचे परीक्षा नियंत्रक डॉ.डी.एन.गुजराथी यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना चांगली वागणुक दिली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तसेच जोपर्यंत  कॅरीआॅन बाबत निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात येणार नाही, तोवर  विद्यापीठ सोडणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला.

प्राधिकरण निवडणूक संपल्यानंतर निर्णय घेवू१७ सप्टेंबर रोजी उमविच्या प्र्राधिकरणांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली असून, १९  सप्टेंबर रोजी  निवडणुकीचा निकाल  जाहीर होणार आहे. त्यामुळे या दरम्यान कॅरीआॅन बाबत निर्णय शक्य नसल्याने २५ सप्टेंबर रोजी कॅरीआॅन बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन प्र्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी दिले. यावेळी परीक्षा नियंत्रक डॉ.डी.एन.गुजराथी, उपकुलसचिव प्रा.बी.बी.पाटील, प्रा.राजेश वळवी यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते. २५ रोजी कॅरीआॅनबाबत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ‘एनएसयुआय’तर्फे देण्यात आला आहे.