शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँक प्रकरणात सुस्पष्ट शपथपत्र द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:36 IST

खंडपीठाचे आदेश : तपासी अधिकाऱ्यांवर ताशेरे

जळगाव : विशेष लेखा परीक्षकांच्या अहवालावरून जिल्हा बँकेत ४०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद माजी नगरसेवक नरेंद्र भास्करराव पाटील यांनी २०१२ मध्ये जिल्हापेठ पोलिसात दिली होती. या प्रकरणी दाखल गुन्हयात आतापर्यंत नुकसानीच्या रकमेच्या वसूलीसाठी काय कार्यवाही केली? याबाबत माहिती देणारे सुस्पष्ट प्रतिज्ञापत्र ५ एप्रिलपूर्वी सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी.व्ही. नलावडे व न्यायाधीश मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने दिले आहेत. मालमत्ता जप्त झाल्या काय? अशी विचारणा करून तपासात काहीही प्रगती नसल्याबाबत तपास यंत्रणेवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.४०० कोटींचे बॅँकेचे नुकसानजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सन २०१२ मध्ये झालेल्या विशेष लेखापरिक्षणात बॅँकेत ४०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचे आढळून आले होते. बॅँकेच्या काही सवलतीच्या योजनांमुळे हे नुकसान झाल्याचे विशेष लेखा परिक्षणातून समोर आले होते.पोलिसात तक्रारयाबाबतचा अहवाल लेखा परिक्षकाने दिल्यानंतर माजी नगरसेवक नरेंद्र भास्करराव पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती़ त्यानुसार ४०० कोटी रूपयांमध्ये बँकेचे नुकसान झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा काही काळ तपास चालला, त्यानंतर तपास संथगतीने सुरू होता़ त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात पोहोचले व त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणावर कामकाज सुरू आहे.मालमत्तांचा तपास घेणे आवश्यकअशा प्रकारच्या आर्थिक व्यवहारातील पैसा हा अधिकतर मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला जात असतो़ त्यामुळे या प्रकरणातील तपासी अधिकारी यांनी अशा मालमत्तांचा शोध घेणे तसेच त्या जप्त करणे आवश्यक होते. त्याबाबत तपासी अधिकारी यांनी आतापर्यंत या मालमत्तांचा शोध घेतला का? तसेच त्याबाबत काय कार्यवाही केली? मालमत्ता जप्त केल्या गेल्यात काय? अशी विचारणा करून ५ एप्रिलपूर्वी स्पष्ट अभिप्राय असलेले शपथ पत्र न्यायालयात दाखल करावे, असे आदेश न्यायाधीश टी़व्ही़ नलवाडे व न्या़ मंगेश़ एस़ पाटील यांनी दिले आहेत.तपासी अधिकाऱ्यांना फटकारलेजिल्हा बँकेचे ४०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्या प्रकरणात संबंधित तपासणी अधिकाºयाकडून तपासात प्रगती झाली नाही़ त्यामुळे तपासी अधिकाऱ्यांना न्यायालयाने फटकारले आहे. या प्रकरणाचा योग्यरित्या व योग्य दिशेने तपास करण्याच्या सुचना देखील न्यायालयाने दिल्या आहे़गुन्ह्याच्या तपासात प्रगती नाहीबँकेचे नुकसान केल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी २७ मार्च रोजी आदेश दिले आहेत. या आदेशात तपासी अधिकाºयांवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. या गुन्ह्यातील तपासात प्रगतीच झालेली नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे़ त्यामुळे योग्य दिशेने तपास व्हावा, अशा सुचना न्यायालयाने तपासी अधिकाºयांना केल्या आहेत़