शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींच्या पंखांना मिळाले बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 15:26 IST

पायपीट थांबली : ग्रामीण भागात मिळाल्या 30 सायकली भेट

ठळक मुद्देव्हाटस्अपची मदत.. वापरात नसलेल्या सायकली वापरातआधारवड ट्रस्टतर्फे पुस्तके

सुहास शूर । लोकमत न्यूज नेटवर्कजामदा ता.चाळीसगाव :  दिल है छोटासा. छोटीसी आशा, मस्तीभरे मनसे, भोलीसी आशा, चाँदतारो को, छुने की आशा, आसमानो मे, उडने की आशा.. आजच्या जमान्यातही रोज 4-6 कि.मी. पायपीट करीत उज्वल भवितव्याची पायाभरणी करणा:या सावित्रीच्या लेकींच्या चिमण्या पंखात उमेदीचे नवे बळ संचारल्याने त्यांचे मन असे या गिताप्रमाणे मोहरलेच पण चेहरेही 30 सायकलींच्या वाटपाने आनंदाने डवरुन निघाले.माध्य. विद्यालय जामदे-रहिपुरी शाळेत भऊर- रहिपुरी-भवाळी या गावातून  रोज 4-6 कि.मी. पायपीट करीत विद्यार्थी येतात. याचा विपरित परिणाम विशेषत: विद्यार्थिनींच्या अभ्यासावर होत असे. विवेकानंद सेवा मंडळ डोंबिवली, जी.के. ट्रस्ट बांद्रा, संदीप येवले नाशिक यांनी या सावित्रीच्या लेकींना 30 सायकलींची मदत नुकतीच दिली. यामुळे विद्याथ्र्याचे कष्ट व श्रम कमी होणार आहेत.व्हाटस्अपची मदत..वापरात नसलेल्या सायकली वापरातशहरातील दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जातात. त्यामुळे त्यांच्या सायकली घरीच पडून असतात. ही बाब हेरुन जामदा शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव ठोके यांनी व्हाटस्अप ग्रुपद्वारे  शाळेतील विद्याथ्र्याची रोजची  ससेहोलपट व शहरात पडून असलेल्या सायकलींचा मुद्दा मांडला. त्याला विवेकानंद सेवा मंडळ, जीके ट्रस्ट व संदीप येवले यांनी त्वरित प्रतिसाद देत 30 सायकली जमा करुन चाळीसगावी रवाना केल्या. आणखी 10-12 सायकलींची मदतही लवकरच मिळणार आहे.आधारवड ट्रस्टतर्फे पुस्तकेआ.बं. हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक के.डी.शिंपी व त्यांचे अमेरिकास्थित पुतणे सुशील शिंपी यांनी शाळेला 15 हजार रुपयाची विविध शैक्षणिक पुस्तके व स्पर्धा परीक्षेची पुस्तके दिली.शाळेनेही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करणार असल्याचे मुख्याध्यापक ठोके यांनी सांगितले. लवकरच शाळेत कलरींग, डिजिटल शिक्षण, सीसीटीव्ही व इतर अनेक उपक्रम राबवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.