शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

येत्या जूनपासून महाराष्ट्रातील मुलींना उच्च शिक्षणही मोफत मिळणार!

By अमित महाबळ | Updated: February 9, 2024 16:57 IST

विद्यापीठात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे आणि नव्याने सुरु झालेल्या योगशास्त्र पदव्युत्तर विभागाचे उद्घाटन करण्यात आले.

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यातील मुलींना अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, वैद्यकीयसह इतर अभ्यासक्रमांना जून २०२४ पासून कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि.९) दिली. ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील एका कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधताना बोलत होते. 

विद्यापीठात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे आणि नव्याने सुरु झालेल्या योगशास्त्र पदव्युत्तर विभागाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाची सुरुवात बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात संदर्भात विद्यापीठ करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. 

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणापूर्वी विद्यार्थी व प्राध्यापकांनी त्यांचे प्रश्न प्रातिनिधीक स्वरुपात मांडावेत, असे आवाहन केले. जामनेर तालुक्यातील एका विद्यार्थ्याने गरीब विद्यार्थ्यांना स्वस्त दरातील वसतिगृह व भोजन, कमी शुल्क, अशी मागणी केली. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही.  जवळपास ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा केली. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील