ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव,दि.4 - शहरातील शिव कॉलनीतील महाविद्यालयीन तरुणी सायली अनिल पाटील हिचा 3 रोजी मध्यरात्री खून झाला. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शिवकॉलनतील रहिवासी असलेल्या सायली पाटील (वय-20) ही विद्यार्थीनी चाळीसगाव महाविद्यालयात बीएस्सीच्या तिस:या वर्षात होती शिकत होती. 3 रोजी मध्यरात्री तिचा खून झाल्याचे उघड झाले. या घटनेमागील कारण समजू शकले नसून पोलीस तपास करीत आहे. दरम्यान, संबंधितच कोणी तरी तिची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीनेही चौकशी सुरु आहे.