शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत ‘नोकरी’ असल्याचे सांगून मिळवली ‘छोकरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लॉकडाऊन काळात सासऱ्यांकडून घेतलेले दीड लाख रुपये फेडायचे असल्याचे जावयाने चक्क बँकेतून रोकड काढणाऱ्यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : लॉकडाऊन काळात सासऱ्यांकडून घेतलेले दीड लाख रुपये फेडायचे असल्याचे जावयाने चक्क बँकेतून रोकड काढणाऱ्यांची बॅग लांबविण्याचाच निर्णय घेतला अन‌् तेथेच फसगत झाल्याने सर्वच कारनाम्यांचा भंडाफोड झाला. राहुल उत्तम चौधरी (वय २५, रा.मांडकी, ता.भडगाव) असे या जावयाचे नाव असून त्याचे प्रताप पाहता पत्नी व सासऱ्यांनी डोक्याला हात मारुन घेतला. दरम्यान, रविवारी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, राहुल याने बँकेत नोकरीला असल्याचे खोटे सांगून छोकरी मिळविल्याचेही उघड झाले आहे.

काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेतून काढलेली दोन लाख रुपयांची रोकड घेऊन दुचाकीकडे चालत जात असलेले धनराज प्रेमराज पुरोहित (६०, रा.शनिपेठ) यांच्या हातातील बॅग हिसकावताना राहुल चौधरी हा शनिवारी दुपारी एक वाजता दुचाकीवरून खाली पडला अन् जमावाच्या तावडीत सापडला होता. जमावाच्या मारहाणीत तो जागेवरच बेशुध्द पडला होता. धनराज पुरोहित यांच्या फिर्यादीवरून राहुल चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक केली आहे. तपासाधिकारी दीपक बिरारी यांनी त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

बँकेत ड्युटीला जातो म्हणून सांगायचा घरी

राहुल हा काहीच कामधंदा करीत नाही. सैन्य दलाची नोकरी सोडून जळगाव शहरातील एचडीएफसी बँकेत नोकरीला आहे, असे खोटं सांगून त्याने मुलगी मिळविली. लग्न झाल्यानंतर रोज दुचाकी घेऊन तो काव्यरत्नावली चौकातील बँकेत ड्युटीला चाललो असे घरी सांगून घराच्या बाहेर पडायचा. संध्याकाळ झाली की घरी परत जायचा. सासरवाडी जळगाव शहरातीलच असून सासरे उच्चभ्रू आहेत. लॉकडाऊन काळात राहुल याने सासऱ्यांकडून दीड लाख रुपये घेतले. हा विषय पत्नीला माहिती होता. आता १४ फेब्रुवारी रोजी मुलाचे लग्न असल्याने सासऱ्यांनी पैशांसाठी तगादा लावला. शालकाचे लग्न म्हटले म्हणजे पैसे द्यावेच लागतील, किती दिवस थापा मारायच्या..म्हणून त्याने बँकेतून रोकड घेऊन जाणाऱ्या सावजचा शोध घेतला. दुचाकीची नंबर प्लेट उलटी केली. बँकेत दबा धरून बसलेला असताना धनराज पुरोहित यांना त्याने हेरले. त्यांचे वय, प्रकृती पाहता त्यांच्याजवळील बँक हिसकावणे सहज शक्य आहे, असे समजून बँकेच्या बाहेर निघून थोडे चालत आलेल्या पुरोहित यांची बॅग लांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्यांनी बॅग घट्ट पकडून ठेवल्याने ते बॅगसह ओढले गेले. त्यात राहुल दुचाकीवरून खाली पडला अन‌् पब्लिकच्या हाती लागला. तेथेच त्याचा भंडाफोड झाला.