शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

सदैव शब्दांच्या अलौकिक सिंहासनावर आरूढ राहणारे व तहयात रसिकांच्या मनावर गारुड करणारे गदिमा पुन्हा होणे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 19:59 IST

सेनापतीने सैनिकांना आदेश करावा व सैनिकांनी कार्यवाहीसाठी सज्ज व्हावे. तसे शब्द जणू ‘गदिमां’समोर हात जोडून उभे राहात असत व एखादं लोकप्रिय गीत किंवा काव्य रसिकांसमोर येत असे. असं सामर्थ्य लाभलेला माणूस म्हणजे ग.दि.माडगुळकर होत आणि म्हणूनच सदैव शब्दांच्या अलौकिक सिंहासनावर आरूढ राहणारे व तहयात रसिकांच्या मनावर गारुड करणारे गदिमा पुन्हा होणे नाही. अनुभव जेव्हा अनुभूतीच्या उच्च पातळीवर जाऊन पोहचतो; त्यावेळी मनात सर्जनशिलता आकारास येते, असे ‘गदिमा एक आठवण : एक साठवण’ या विषयापर व्याख्यान देताना राजन लाखे यांनी हे भावोद्गार काढले.

ठळक मुद्देव्याख्यानमालेत कवी राजन लाखे यांचे प्रतिपादनमसापच्या व्याख्यानमालेत गदिमांच्या स्मृतींना उजाळागदिमांच्या अनेक कविता व गाजलेल्या गीत, भावगीत, बालगीत, लावणी, अभंग आणि गीतरामायण याचे सादरीकरण

चाळीसगाव, जि.जळगाव : सेनापतीने सैनिकांना आदेश करावा व सैनिकांनी कार्यवाहीसाठी सज्ज व्हावे. तसे शब्द जणू ‘गदिमां’समोर हात जोडून उभे राहात असत व एखादं लोकप्रिय गीत किंवा काव्य रसिकांसमोर येत असे. असं सामर्थ्य लाभलेला माणूस म्हणजे ग.दि.माडगुळकर होत आणि म्हणूनच सदैव शब्दांच्या अलौकिक सिंहासनावर आरूढ राहणारे व तहयात रसिकांच्या मनावर गारुड करणारे गदिमा पुन्हा होणे नाही. अनुभव जेव्हा अनुभूतीच्या उच्च पातळीवर जाऊन पोहचतो; त्यावेळी मनात सर्जनशिलता आकारास येते, असे ‘गदिमा एक आठवण : एक साठवण’ या विषयापर व्याख्यान देताना पिंप्री-चिंचवड (पुणे) येथील कवी-राजन लाखे यांनी हे भावोद्गार काढले.महाराष्टÑ साहित्य परिषदेच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे २७ रोजी दुसरे पुष्प चाळीसगाव येथील अरिहंत मंगल कार्यालयात गुंफतांना ते बोलत होते. व्यासपीठावर म.सा.प.चे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य तानसेन जगताप, कार्याध्यक्ष विजय पाटील, प्रमुख कार्यवाह गणेश आढाव, व्याख्यान प्रायोजक प्रा.शरश्चंद्र छापेकर हे विराजमान होते.आपल्या प्रवाही व प्रभावी वाक्पटूतेतून त्यांनी गदिमांच्या अनेक कविता व गाजलेल्या गीत, भावगीत, बालगीत, लावणी, अभंग आणि गीतरामायण याचे तोंडपाठ सादरीकरण करून रसिकांना दीड तास खिळवून ठेवले. व्याख्याता परिचय कार्यकारिणी सदस्य रामचंद्र गोसावी यांनी करून दिला. प्रारंभी गदिमांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त ग्रीष्मा पिंगळे या चिमुकलीने गदिमांचं गाजलेलं घननिळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा हे गीत सादर केले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष प्रा.अशोक वाबळे यांनी तर आभार संगीता देव यांनी केले. व्याख्यानास कार्यकारिणी सदस्य, सभासद, दत्तभक्त मंडळ सदस्य, विश्वस्त मंडळ पदाधिकारी, सदस्य आणि रसिक उपस्थित होते.