शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सावट इथले दूर होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 12:54 IST

नोटाबंदीच्या दोन वर्षांनंतरही अद्यापही परिणाम कायम

विजयकुमार सैतवालजळगाव : देशातील काळा पैसा बाहेर यावा, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी नोटाबंदीचा घेण्यात आलेला निर्णय सर्वच क्षेत्राच्या मुळावर आल्याने दोन वर्षानंतरही त्याचे सावट दूर झालेले नाही. जळगावातील सुवर्ण व्यवसाय असो की पाईप उद्योग यांना याचा मोठा फटका बसला. जळगावातील महत्त्वाचा उद्योग असलेल्या पाईप उद्योगावरील सावट अद्यापही दूर झालेले नाही तर दुसरीकडे स्वॅपच्या भुर्दंडाने ग्राहक त्रस्त आहेत.देशातील काळा पैसा बाहेर यावा, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी करण्यात आली. देशाच्या विकासासाठी नागरिकांनी प्रचंड हालअपेष्टा सहन करीत पंतप्रधानांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले. ५० दिवसानंतर स्थिती पूर्वपदावर येईल, नागरिकांचे हाल थांबतील, बँकांमध्ये चलन वाढेल, कॅशलेससाठी स्वॅपचा मोठा वापर वाढेल, अशी आशा होती. स्वॅपचा वापर वाढला मात्र त्याचा भूर्दंड ग्राहक अथवा व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. इतकेच उद्योग, व्यापार क्षेत्रावर नोटाबंदीच्या दोन वर्षांनंतरही अद्यापही परिणाम कायम आहे. सुवर्ण व्यवसाय यातून सावरला असला तरी वर्षभर व्यवसायावर झालेले परिणाम न विसरण्यासारख्या असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. बांधकाम क्षेत्रात गुंतवणूकदेखील कमी झाली आहे.जुन्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर सर्वच व्यवहारांवर त्याचा परिणाम झाला. यातून ५०० वस्तूंची मुख्य बाजारपेठ असलेल्या जळगावातील दाणाबाजारालाही याच्या मोठ्या झळा सोसाव्या लागल्या. नोटाबंदीतून कॅशलेस व्यवहार वाढावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला तरी जळगावात बाजारपेठेत वर्षभरानंतरही असे चित्र नव्हते. आताही कॅशलेससाठी शुल्क आकारले जात असल्याने जनता यापासून लांबच आहे. नोटाबंदीनंतर पहिले आठ दिवस तर दाणाबाजारात शुकशुकाट होता. ‘कॅशलेस’ व्यवहाराची चर्चा असली तरी ग्रामीण भागात अद्यापही या व्यवहाराबाबत नागरिकांच्या मनात भीती आहे. हे नागरिक स्वॅपद्वारे व्यवहार करण्यास धजावत नाही. इतकेच काय धनादेश देण्यासही ते तयार नाही. स्वॅप करताना शुल्क लागत असल्याने व्यापारी व ग्राहकांना झळ बसते. त्यामुळे हे शुल्क रद्द करण्याची मागणी आहे. मात्र दोन वर्षानंतरही तसे झालेले नाही. त्यामुळे कॅशलेसचा उद्देश साध्य होऊ शकलेला नसल्याचे सांगितले जात आहे.नोटाबंदीनंतर सुवर्ण व्यवसायाला लागलेली घरघर विविध कारणांनी वर्षभर कायम होती. हे एक वर्ष सुवर्ण व्यवसायासाठी कटू आठवणी असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्या नोटा बँकेत जमा झाल्याने नागरिकांच्या हाती पैसा नव्हता. त्यामुळे सुवर्ण व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे ‘सुवर्णनगरी’ अशी ओळख असलेल्या जळगावातील या बाजारात पहिले तीन महिने सामसूम होती. त्यानंतर थोडीफार उलाढाल सुरू झाली, तीदेखील लग्न सराईच्या खरेदीमुळे.पाईप उद्योग यातून सावरत असला तरी त्याच्यावर अप्रत्यक्ष परिणाम असल्याचे पाईप उद्योगजकांचे म्हणणे आहे. बांधकाम क्षेत्रात मागणी घटल्याने घरांसाठी लागणाºया पाईपचीही विक्री कमी झाली असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. नोटाबंदीमुळे कापड व्यवसायावरील परिणाम अजूनही कायम आहे. नोटाबंदीनंतर या व्यवसायावर ५० टक्के परिणाम झाला व त्याच्या झळा अजूनही कायम आहे.