शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

गॅस टँकरने दिली कारला धडक

By admin | Updated: September 24, 2015 00:13 IST

धुळे : धावत्या गॅस टॅँकरचा अचानक पुढचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टॅँकर समोरून येणा:या कारला धडकला.

धुळे : धावत्या गॅस टॅँकरचा अचानक पुढचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टॅँकर समोरून येणा:या कारला धडकला. हा अपघात 21 सप्टेंबरला सकाळी 8.20 वाजेच्या सुमारास नागपूर-सुरत महामार्गावर मोराणे, ता.धुळे शिवारातील इच्छापूर्ती गणपती मंदिराजवळ झाला. अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात टॅँकरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विष्णू मुन्नालाल ओझा (28, रा.धोदा, जि.मुरेना, मध्य प्रदेश) हा (जीजे 6 टीटी 9340) क्रमांकाचा गॅस टॅँकर धुळ्याकडून साक्रीकडे घेऊन जात होता. महामार्गावर या टॅँकरचा पुढचा टायर अचानक फुटल्याने टॅँकर समोरून येणा:या (एमएच 39 जे 5849) क्रमांकाच्या कारला धडकला.

या अपघातात अशीद जालमसिंग नाईक (21, रा.नवापूर) व हेमंत प्रतापसिंग नाईक (20, रा.खांडबारा) हे दोघे जखमी झाले. याप्रकरणी हे. कॉ. के.एम. दामोदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टॅँकरचालक विष्णू ओझा याच्यावर भादंवि कलम 279, 337, 338, 427 सह मोटारवाहन कायदा कलम 14, 134, 177 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा

प्रिंटिंग प्रेस चालू करण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह चौघांवर नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जयश्री ललितकुमार वाघ (रा.श्रीरामनगर, जळगाव, ह.मु. वाघाडी बुद्रूक, ता.शिंदखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी ललितकुमार प्रल्हाद वाघ, प्रल्हाद कौतिक वाघ, मालतीबाई प्रल्हाद वाघ, वंदनाबाई दिलीप पाटील (सर्व रा.श्रीरामनगर, जळगाव) यांनी 22 मे 2014 ते 9 नोव्हेंबर 2014 या काळात फिर्यादी जयश्री वाघ यांचा, माहेरून एक लाख रुपयांच्या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केला. त्यांच्या अंगावरील पाच ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र व 20 ग्रॅमची सोन्याची मंगळचेन काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून वरील संशयितांवर भादंवि कलम 498 (अ), 406, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.