शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातील सम्राट कॉलनीत मध्यरात्री जुगार अड्यावर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 13:45 IST

महामार्गाला लागून असलेल्या मनपा घरकुलाच्या शेजारी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मध्यरात्री धाड टाकली. त्यात २९ जुगा-यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून  ८४ हजार ७७० रुपये रोख,५ दुचाकी, मोबाईल असा ३ लाख १४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे २९ जणांना अटकस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई  तीन लाख १४ हजाराचा ऐवज जप्त

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१८ : महामार्गाला लागून असलेल्या मनपा घरकुलाच्या शेजारी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मध्यरात्री धाड टाकली. त्यात २९ जुगा-यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून  ८४ हजार ७७० रुपये रोख,५ दुचाकी, मोबाईल असा ३ लाख १४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.महामार्गाला लागून असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये भरत दिलीप बाविस्कर (रा.सम्राट कॉलनी, जळगाव) याच्या मालकीचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार कुराडे यांनी सहायक निरीक्षक सागर शिंपी, सहायक फौजदार नुरोद्दीन शेख, सुभाष पाटील, राजेंद्र पाटील, नारायण पाटील, रवींद्र घुगे, सतीश हळणोर, रवींद्र चौधरी, शरद सुरळकर, प्रवीण हिवराळे यांच्या पथकाला रात्री बारा वाजता कारवाईसाठी रवाना केले. या पथकाने शेडला घेरुन २९ जणांना पकडले. यावेळी काही जुगारी पळून जाण्याच यशस्वी झाले.या जुगा-यांना केली अटकपिरन वजीर पिंजारी (वय ३५, रा. तांबापुरा, जळगाव), अब्दुल रहेमान अब्दुल रऊफ (वय ४५, रा.शनी पेठ, जळगाव), शिवाजी पांडूरंग माळी (वय ३२ रा.सम्राट कॉलनी, जळगाव), राहूल सुरेश पाटील (वय २४, रा. लक्ष्मी नगर, जळगाव), विजय धनराज मोरे (वय २३, रा.रायपुर, ता.जळगाव), आकाश सुरेश पाटील (वय २२, रा.सम्राट कॉलनी,जळगाव), संजय मुरलीधर जोशी (वय ५०, रा.बालाजी पेठ, जळगाव), विठ्ठल जयराम हटकर (वय ३५, रा. तांबापुरा, जळगाव), नुरखान लिकायत खान (वय २५, रा.तांबापुरा, जळगाव), श्याम संतोष चव्हाण (वय २५, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव), विजय साहेबराव पाटील (वय ४०, रा.अयोध्या नगर, जळगाव), दीपक बन्सीलाल जैन (वय ३७, रा.मोहाडी फाटा, जळगाव), लखनसिंग देवसिंग पाटील (वय ४०, कुसुंबा, ता.जळगाव), प्रशात भरत शिंपी (वय २७,मेस्को माता नगर, जळगाव), अरफान खान फिरोज खान (वय २६, रा.बळीराम पेठ, जळगाव), जीवन सुभाष मराठे (वय २८, रा.कुसुंबा, ता.जळगाव), सागर वासुदेव पाटील (वय २२, रा.ईश्वर कॉलनी, जळगाव), रवींद्र रामदास ठाकूर (वय ४५, रा.शिरसोली प्र.बो.ता.जळगाव),शिवाजी वसंत झुरकाळे (वय २५, रा.शिरसोली प्र.बो.ता.जळगाव), संजय प्रकाश वालेचा (वय ३५, रा.सिंधी कॉलनी,जळगाव), किरण रमेश माळी (वय ३० रा.शनी पेठ, जळगाव), किशोर लोटू बारी (वय ३३ रा.शिरसोली, ता.जळगाव), संजय पुंडलिक बारी (वय ३२, रा.शिरसोली, प्र.बो.), संजय मोरसिंग चव्हाण (वय ४३, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव), गोकुळ दिलीप बाविस्कर (वय २८, रा.लक्ष्मी नगर, जळगाव), महेंद्र दशरथ फुसे (वय २७, रा.शिरसोली प्र.न.), प्रशांत राजाराम भोलाणे (वय २७, रा.लक्ष्मी नगर, जळगाव), आकाश सिताराम कोळी (वय २३, रा.मोहाडी, ता.जळगाव) व रवींद्र भगवान बारी (वय ४७, रा.शिरसोली प्र.बो.ता.जळगाव) यांचा समावेश आहे. या जुगा-यांना पहाटे तीन वाजता जामीनावर मुक्त करण्यात आले.