शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

शिवसेना मंत्र्यांच्या जिल्ह्यासाठी निधीचा भोपळा

By admin | Updated: March 16, 2017 00:27 IST

जलयुक्त शिवार योजनेसाठी निधी मुक्त : राज्यात केले 75 कोटींच्या निधीचे वाटपजलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत राज्यातील 5

जळगाव : जलयुक्त शिवार योजनेसाठी निधी मुक्त : राज्यात केले 75 कोटींच्या निधीचे वाटपजलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत राज्यातील 5 हजार 292 गावांमधील जलसंवर्धनाच्या कामांसाठी शासनाने 14 मार्च रोजी 75 कोटींच्या निधीचे वितरण केले. मात्र, शिवसेनेचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामासाठी शासनाने एक रुपयाचादेखील निधी दिलेला नाही. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यालादेखील निधीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत राज्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाने 875 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीपैकी 800 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण झाले होते. उर्वरित 75 कोटींच्या निधीचे वितरण बाकी असल्याने 14 मार्च रोजी जिल्हानिहाय या निधीचे वितरण करण्यात आले.12 जिल्ह्यांना निधी डावललाराज्य शासनाने निधीचे वितरण करीत असताना तब्बल 11 जिल्ह्यांना डावलले आहे. त्यात ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, धुळे, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, अकोला, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांना एक रुपयाचादेखील निधी दिला नाही. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या औरंगाबाद जिल्ह्यासाठी 4 कोटी 6 लाखांचा निधी मंजूर केला आहे.आठ जिल्ह्यात शिवसेनेचे पालकमंत्रीजलयुक्त शिवार योजनेच्या निधीच्या वितरणातून डावलण्यात आलेल्या 12 पैकी 8 जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचे पालकमंत्री आहेत. त्यात ठाणे (एकनाथ शिंदे), सिंधुदुर्ग (दीपक केसरकर), धुळे (दादा भुसे), परभणी (गुलाबराव पाटील), नांदेड (अजरुन खोतकर), उस्मानाबाद (दिवाकर रावते), भंडारा (डॉ. दीपक सावंत) या जिल्ह्यांचा समावेश आहे, तर यवतमाळचे पालकमंत्रिपद मदन येरावार यांच्याकडे असले तरी सहपालकमंत्रिपद शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे  आहे. बीड व अकोला वंचितमहिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा, डॉ. रणजित पाटील यांचा अकोला जिल्हा व सुभाष देशमुख यांचा सांगली जिल्हादेखील निधीपासून वंचित राहिला आहे, हे तिन्ही मंत्री भाजपाचे आहेत.    मुंबई महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणूक आणि आता शेतक:यांना कजर्माफी द्यावी या मुद्यांवरून शिवसेना व भारतीय जनता पार्टीमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. सेना व भाजपातील मतभेदांसोबत आता मनभेददेखील समोर आले आहेत. जलयुक्त शिवार योजनेच्या श्रेयावरून शिवसेना व भाजपामध्ये नेहमी वाद होत राहिले आहे. त्यातच शिवसेनेचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांना एक रुपयाचाही निधी न मिळाल्याने दोन्ही पक्षांतील मनभेदावर शिक्कामोर्तब होत आहे.जलयुक्त शिवार योजनेसाठी वितरित केलेल्या 75 कोटींची पुरवणी मागणी होती. 18 मार्च रोजी होणा:या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेंतर्गत होणा:या कामांसाठी सर्वच जिल्ह्यांसाठी मोठय़ा प्रमाणात निधीची तरतूद करण्यात येणार आहे. त्या वेळी निधी न मिळालेल्या 12 जिल्ह्यांना निधी देण्यात येईल.-गिरीश महाजन, जलसंपदामंत्री, महाराष्ट्र