शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

एफएसआयच्या नियमांमुळे बांधकाम क्षेत्राला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चटई निर्देशांकांच्या (एफएसआय) नियमांमध्ये नव्या बांधकाम नियमावलीत बदल झाला आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी आनंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : चटई निर्देशांकांच्या (एफएसआय) नियमांमध्ये नव्या बांधकाम नियमावलीत बदल झाला आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला आहे. पूर्वीपेक्षा जास्त एफएसआय मिळणार आहे. सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फी भरून आणखी जादाचा एफएसआय मिळवता येणार आहे.

राज्य सरकारने नुकतीच बांधकामक्षेत्रासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेले ‌व्यावसायिक, सिव्हिल इंजिनियर, आर्किटेक्ट यांना त्याचा फायदा होणार आहे. नव्या नियमांमुळे चटई निर्देशांक वाढून मिळणार आहे. त्यात ९ ते १२ मीटर रस्ता असेल, तर २ एफएसआय, १२ ते १५ मीटर रस्ता असेल तर २.२५, १५ ते २४ मीटरसाठी २.५० एफएसआय दिला जाणार आहे. तसेच ३० मीटर रस्ता असेल तर अतिरिक्त फी भरून रहिवास आणि व्यावसायिक वापरासाठी जादाचा एफएसआय दिला जाणार आहे. या अतिरिक्त एफएसआयसाठी बांधकाम व्यावसायिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांना अतिरिक्त फी द्यावी लागणार आहे.

२०१६ला आलेल्या नियमांमुळे बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला होता. मात्र आताचे नियम हे या व्यवसायाच्या वाढीसाठी अनुुकूल आहेत.

शहरालगतच्या भागाचे काय

जळगाव शहरालगत असलेल्या आव्हाणे, सावखेडा, कुसुंबा या भागांत ग्रामपंचायत असली तरी तेथे विकास होण्यास वाव आहे. मात्र त्याचे नियम वेगळे आहेत. ग्रीन झोनच्या नियमांमुळे मोठी अडचण होते. मात्र नव्या नियमावलीने तेथेही विकासाला काहीसा वाव मिळणार आहे.

कोट - राज्य सरकारने बांधकाम उद्योगांसाठी आणलेली नवी नियमावली ही फायदेशीर आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक दोघांचा फायदा होणार आहे. त्यासोबतच शहरालगत असलेल्या गावांच्या विकासाचा मुद्दाही सोडवला तर जास्त फायदा होईल

- गनी मेमन, बांधकाम व्यावसायिक

कोट - नवीन बांधकाम नियमावलीतील एफएसआयच्या नियमांचा फायदा होणार आहे. त्यामुळे विकासाला वाव मिळेल. तसेच अतिरिक्त एफएसआय घेता येणार आहे. हे नियम बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक दोन्हींच्या फायद्याचे आहे.

- अब्बास मकरा, क्रेडाई