शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत दुफळी हीच भाजपासाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 11:53 IST

चाळीसगाव तालुका

ठळक मुद्देस्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेला सेनेचा 'टेकू' 

चाळीसगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस - राष्ट्रवादीचे वर्चस्व आणि विधानसभेत भाजपाचे 'कमळ' फुललेले. चाळीसगाव तालुक्याच्या राजकीय सारीपाटावरील हे चित्र. मात्र २०१४ नंतर ही समीकरणे बदलली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपाने मुसंडी मारली असली तरी, अंतर्गत गटबाजी त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. दिलजमाई न झाल्यास राष्ट्रवादीच्या 'घड्याळाला' ही रसद चावी भरण्यासाठी मदतगार ठरु शकते. असे सध्याचे चित्र आहे.एकेकाळी काँग्रेस - राष्ट्रवादीचे तालुक्यावर एकहाती वर्चस्व होते. १९८९ मध्ये भाजपाने या वर्चस्वाला पहिल्यांदा तडाखा दिला. गेल्या ३० वर्षात २००९ ते २०१४ या पाच वषार्चा अपवाद वगळता राष्ट्रवादीला विधानसभेत भाजपाला मात देणे शक्य झाले नाही.ग्रामीण भागात राष्ट्रवादी आणि भाजपाचे प्राबल्य आहे. शिवसेनेची धडपड मात्र सुरु असते. स्व. पप्पू गुंजाळ यांनी २०१४ मध्ये शिवसेनेला मोठे बळ दिले होते. अलिकडे काँग्रेस देखील प्रवाहात येण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.२०१४ नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेची समीकरणेही बदलली असून सद्यस्थितीत भाजपाच्या सत्तेला सेनेचाच 'टेकू' आहे.आता युती झाल्याने भाजपाला याचा फायदा होईल. अर्थात यासाठी सेनेला विश्वासात घेऊन त्यांना जवळ बसवावे लागणार आहे.गेल्या साडेचार वर्षात आमदार उन्मेष पाटील यांनी सेनेशी समन्वय साधतांना बाजार समिती व पालिकेत सत्तांतर घडवून आणले. दुसरीकडे भाजपातील 'नवे - जुने' ही दुफळी अलिकडे तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. आमदारांना डावलून एका गटाकडून स्थानिक कार्यक्रम होत आहे.त्यामुळे प्रचाराच्या मोहिमेवर निघण्यापूर्वी दूफळीवर उपाय करावा. असा सूर कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.गुलाबराव देवकर तालुक्याचे भूमिपूत्रराष्ट्रवादीतर्फे गुलाबराव देवकर यांनी लोकसभेचा प्रचार सुरु केला असून काही दिवसांपूर्वी त्यांनी येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही घेतल्या. देवकर हे तालुक्याचे भूमिपुत्र आहेत. तालुक्यातील 'पळासरे' हे त्यांचे मूळ गाव आहे.

टॅग्स :Politicsराजकारण