शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गाळमुक्त धरण योजनेचा फज्जा

By admin | Updated: June 4, 2017 01:03 IST

चोपडा : वनविभागाच्या जाचक अटींमुळे अनेक वर्षापासून गाळ धरणातच साचून

चोपडा : सातपुडय़ाच्या कुशीत वसलेल्या चोपडा तालुक्यात पावसाचे पाणी अडविण्यासाठी व जमिनीत मुरविण्यासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून बांध बांधले गेले. बहुतेक बांध हे वनविभागाच्या हद्दीत असून ते गाळाने  भरले आहेत. मात्र  वनविभागाच्या जाचक अटीमुळे या बांधातील गाळ वर्षोनुवर्षे काढला जात नाही. त्यामुळे यावर्षी शासनाने काढलेल्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या चांगल्या योजनेचा फज्जा उडाला आहे.चोपडा तालुका पाण्याच्या बाबतीत  सधन आहे. सातपुडय़ाच्या पर्वतरांगांनी  नटलेल्या उत्तर भागातून येणारे नैसर्गिक जलस्नेत मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षापासून पावसाचे कमी होत जाणा:या प्रमाणामुळे पाण्याची पातळी  खालावत जात आहे. यावर्षी तर अनेकांच्या विहिरी व कूपनलिका बंद पडल्याने पिके जळाल्याचीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. शासनाच्या विविध योजनांतून सातपुडय़ाच्या परिसरात अनेक बांध बांधण्यात आले. काही बांधांना तीस ते चाळीस वर्षे झाली तरी त्यांची डागडुजीदेखील झालेली नाही.  गाळ भरल्याने अनेक बांध वाहून गेले तर काहींची ओसांडा भिंत पडून बांधास भगदाड पडून बंधा:यांची क्षमता नष्ट झाल्याचे निदर्शनास येते. मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही. अनेक बांध गाळाने भरलेचोपडा तालुक्यातील वनविभागाच्या हद्दीतील किमान 25 ते 30 बांध गाळाने भरलेले आहेत. त्यातील गाळ काढण्यासाठी वनविभागाकडून शेतक:यांना परवानगी दिली जात नाही.  यासाठी अनेकदा प्रय} करूनही काही उपयोग होत नाही. परिणामी या बंधा:यांची साठवण क्षमता नष्ट झाली आहे. त्यामुळे शेतक:यांचे नुकसान होते.या कारणांमुळे शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेचा फज्जा उडताना दिसून येत आहे. सध्या केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने त्यांनी याबाबत प्रय} करून, शेतक:यांना दिलासा दिला पाहिजे, अशी मागणी होत आहे. म्हणून हे काम शासन स्तरावर लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रय} व्हावेत अशी मागणी होत        आहे.वनविभागात असलेल्या बांधाचा गाळ काढून बाहेर घेऊन जाण्याची परवानगी नाही. म्हणून शेतक:यांना  व ग्रामस्थांना हा गाळ काढायला परवानगी देता येत नाही.- पी.आर. पाटील, सहायक वनसंरक्षक, चोपडागेल्या अनेक वर्षापासून येथील सर्वात मोठय़ा बांधाचा गाळ काढण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी ग्रा.पं.वरगव्हाणकडून प्रत्येक वर्षी ठराव पाठविण्यात येतो. मात्र परवानगी मिळत नाही.- जयसिंग पाटील, शेतकरी, वरगव्हाण