शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नापूर्वीच वेरूळचे प्रेमीयुगुल पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: January 14, 2017 00:38 IST

जळगाव : एकाच गावात़़़एकाच गल्लीत लहानाचे मोठे झाल़े आठवीपासून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल़े.

जळगाव : एकाच गावात़़़एकाच गल्लीत लहानाचे मोठे झाल़े आठवीपासून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल़े.  दोघांनी पदवीर्पयत शिक्षण घेतल़े लग्नासाठी मात्र घरच्यांचा नकार, यामुळे वेगळे होण्याच्या भितीने दोघांनी घरून पळून लग्न करण्याचे ठरविल़े मात्र लग्नापूर्वीच वेरूळ ता. खुलताबाद येथील प्रेमीयुगुलाला    पोलिसांनी जळगावातील पिंप्राळा हुडकोतून  ताब्यात घेतले आह़े  वेरूळ हेच या दोघांचे गाव़ गावातील एका शाळेत दोघे शिकत असताना आठवीत दोघांचे एकमेकांवर प्रेम जडल़े दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेत पदवीर्पयत सोबत शिक्षण पूर्ण केल़े दोघांच्या लग्नात जातीचा मोठा अडसर होता़ यामुळेच त्यांच्या  कुटुंबियांचा लग्नाला नकार होता़ एकमेकांसोबत जगण्याची अन् मरणाची शपथ घेत एकमेकांनी वेगळे होण्याच्या भितीने पाच दिवसांपूर्वी गावातून पलायन केले होत़ेबसने गाठले जळगावघरून तर निघाले मात्र पळून जाणार कुठे? असा प्रश्न दोघांसमोर होता़ मात्र यातील प्रियकर याचा जळगावात मित्र होता़ त्याच्याकडे काही दिवस राहू व यानंतर लग्न करू असे दोघांनी ठरविल़े त्यानुसार दोघे 11 जानेवारी रोजी बसने जळगावात आल़े कुटुंबियांनी दोघांचा शोध घेतला मात्र मिळून न आले नाहीत़ त्यांच्या विरूध्द पालकांनी दिलेल्या खबरीवरून खुलताबाद पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती.  पिंप्राळा हुडकोतील मित्रांकडे दोघेशहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील गणेश शिरसाळे व दुष्यंत खैरनार हे रात्री गस्तीवर असताना त्यांना पोलीस ठाण्यातून खुलताबाद पोलीस आल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार दोघांनी गोपनीय बातमीदाराच्या मार्फत व मोबाईल लोकेशनच्या आधारावर दोघांचा शोध घेतला़  राजमालती, भारतनगरानंतर दोघे पिंप्राळा हुडकोत असल्याचे समजल़े त्यानुसार शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद करून दोघांना पहाटे पाच वाजेच्या सुमारास खुलताबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल़ेखुलताबादच्या पथकाने घेतली मदत खुलताबाद पोलिसांनी तक्रारीवरून दोघांचा शोध सुरू केला़ दोघांच्या मोबाईल लोकेशन ट्रेस केल्यानंतर ते जळगावात असल्याची माहिती मिळाली. पोलीस हेडकॉस्टेबल काथार हे दोन कर्मचा:यांसह 13 रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास जळगावात आल़े खुलताबाद येथील पथकाने दोघांच्या शोधकामी शहर पोलिसांची मदत घेतली़