आॅनलाईन लोकमतभुसावळ, दि.६ - शहरात श्री विसर्जन मिरवणकीचा जल्लोष सुरू असताना ५ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास भुसावळ बाजार पोलीस स्टेशनजवळ ललित उर्फ विक्की हरी मराठे (वय २१, रा.भारतनगर) याचा मित्राने छातीवर चाकूने सपासप वार करीत निर्घृृण खून केला. पूर्व वैमनस्य आणि प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या खून प्रकरणातील संशयित आरोपी राजेंद्र उर्फ गोलू सुभाष सावकारे (रा.न्यू एरिया वॉर्ड) यास अटक करण्यात आली आहे.खुनाच्या या घटनेने शहरात श्री विसर्जन मिरवणुकीला एक प्रकारे गालबोटच लागले आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशीच भुसावळ शहरात खुनाची घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरवणूक बंदोबस्तावर असलेले अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग, भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करीत रात्रीच आरोपी साववकारे यास अटक केली आहे. दरम्यान, खून प्रकरणातील आरोपी सावकारे हा भुसावळचे माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते रामदास सावकारे यांचा पुतण्या असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
पोलीस स्टेशनसमोरच युवकाचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 17:11 IST
गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान भुसावळ शहरात घडली घटना
पोलीस स्टेशनसमोरच युवकाचा निर्घृण खून
ठळक मुद्देभुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनसमोरील रेल्वेच्या भिंतीजवळ झाला खूनपूर्ववैमनस्य व प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाजपोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी राजेंद्र उर्फ गोलू सुभाष सावकारे याला तत्काळ अटक केली.