शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

चिमुकलीच्या भविष्यासाठी मैत्रीच्या ‘धाग्या’चा आधार, जळगावात मयताच्या कुटुंबासाठी सरसावले मित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 12:59 IST

पतंगाची विक्री करून देणार आर्थिक मदत

ठळक मुद्देपतंग विक्रीसाठी लावले बॅनरपतंग विक्री होऊन मिळणारी रक्कम सपकाळे कुटुंबाला

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 14 -   हसत-खेळत आनंदाने संसार सुरू असताना अचानक आजाराने डोके वर काढत घराचा आधार असलेल्या महेश सपकाळे (वय 30, रा. कोल्हे वाडा) या तरुणाचा मृत्यू झाला. यामुळे कुटुंबावर संकट तर ओढावलेच, सोबतच केवळ एक महिन्यांच्या चिमुकलीचे पितृछत्रही हरपले. अशा वेळी महेशच्या मित्रांनी पुढाकार घेत या कुटुंबाच्या मदतीसाठी संक्रातीच्या पाश्र्वभूमीवर पतंगाचे दुकान लावून आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मैत्री, माणुसकी सध्या हरवत चालली आहे, अशी सातत्याने सर्वत्र  ओरड होताना दिसते. मात्र जळगावातील जोशी पेठ भागामधील हर हर महादेव मित्र मंडळाचे कार्य पाहिले तर अजूनही मैत्रीची जाण ठेवत माणुसकी जपली जात असल्याचा सुखद अनुभव येईल. या मंडळाने धार्मिक कार्यासह आता समाजाचे काही देणे लागतो, या विचाराने संकटात सापडलेल्या मित्राच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. घराचा आधार हरपलाकोल्हे वाडा भागातील रहिवासी असलेले महेश ज्ञानेश्वर सपकाळे हे रिक्षा चालवून तर कधी कंपनीत काम करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत असत. घरात वृद्ध आई-वडील, पत्नी तसेच केवळ एक महिन्याची मुलगी असे सदस्य असून महेश सपकाळे हेच कुटुंबाचा आधार. मेहतीने सर्व व्यवस्थित सुरू असताना अचानक महेश यांना आजार उद्भवला व त्यांना पुणे येथे हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली. मात्र दैवाने घात करीत सपकाळे कुटुंबाचा आधार हिरावून घेतला. कुटुंबाचा आधार तर गेलाच शिवाय केवळ एक महिने वय असलेल्या चिमुकलेचे पितृछत्रही हरपले. यामुळे या कुटुंबावर आभाळ कोसळले असून काय करावे, अशा विवंचनेत वृद्ध आई-वडील व पत्नी सापडले आहेत. मित्र परिवार सरसावलामहेश सपकाळे हे स्वराज्य निर्माण सेनेचे संस्थापक होते व त्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात पुढाकार घेत होते. त्यामुळे त्यांची ही भावना आपणही जपली पाहिजे, यासाठी या कुटुंबाला मोठी आर्थिक मदत तर करू शकत नाही, मात्र प्रासंगिक सण-वार ओळखून त्यात व्यवसाय करणे व त्यातून मिळणारा नफा सपकाळे कुटुंबाला देण्याचा निर्णय महेशचे मित्र तसेच जोशी पेठेतील हर हर महादेव मित्र मंडळाच्या पदाधिकारी, सदस्यांनी घेतला. 

...अन् थाटले पतंगाचे दुकानसंक्रातीचा सण तोंडावर आल्याने या काळात पतंगांना मोठी मागणी वाढते. हे ओळखून मंडळाच्या पदाधिका:यांनी पतंगाचे दुकान लावून आपापले काम, नोकरी संभाळत ते या दुकानावर बसत आहेत. विशेष म्हणजे या मंडळींनी स्वत: 10 हजार रुपयांची पतंग खरेदी केली असून त्यातून जो काही नफा होईल तो सर्व सपकाळे कुटुंबास व एक महिन्याच्या चिमुकलीच्या भविष्यासाठी देणार आहे. यामध्ये मंडळाचे अध्यक्ष दीपक सोनार, गणेश शेटे, कल्पेश शेटे, सागर कापुरे, विनय सोनार, आकाश बारी, रितेश कुंटे, श्रेयस कुंटे, राकेश कुंटे, केतन चौधरी या मित्रांनी जणू महेशच्या मैत्रीचा धागा पतंगाला बांधून चिमुकलीच्या भविष्यासाठी आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. 

पतंग विक्रीसाठी लावले बॅनरजास्तीत जास्त पतंग विक्री होऊन त्यातून मिळणारी रक्कम सपकाळे कुटुंबाला द्यायची असल्याने या पतंग विक्रीसाठी मंडळाच्या सदस्यांनी याबाबत बॅनरही लावले असून त्यास शहरवासीयांचा प्रतिसाद मिळत आहे. 

यापुढेही विचार करूगेल्या वर्षीही मंडळाने पतंगाचे दुकान लावून त्यात मिळालेल्या नफ्यातून दुर्गात्सवात आर्थिक मदत केली होती. यंदा पतंग विक्रीस कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून पुढील वर्षीही असाच उपक्रम राबवित चिमुकलीला मदत करण्याचा विचार करू, असे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.