शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

भरधाव वाहनाच्या धडकेत मालवाहतूक चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : तालुक्यातील खडकीच्या दिशेने जात असलेल्या मालवाहतूक गाडीला भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : तालुक्यातील खडकीच्या दिशेने जात असलेल्या मालवाहतूक गाडीला भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पातोंडा गावाजवळ शुक्रवारी सायंकाळी घडली.

याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील खडकी येथील राकेश दत्तू देसले (वय २९) हा मालवाहतूक गाडी (एमएच‌-४१-जी-६५६७) चालवीत खडकी गावाच्या दिशेने जात होता. तेव्हा पातोंडा गावाजवळील वळणावर चाळीसगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने (एमएच-०४-इएल-२८७०) जोरदार धडक दिली. या अपघातात राकेश दत्तू देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पातोंडा गावाजवळील वळणावर घडला.

अपघात होताच अज्ञात वाहनचालक तेथून पसार झाला. राकेश देसले यांना ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. रतन श्रीपत पाटील, रा. खडकी, ता. चाळीसगाव यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसांत अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास अनिल अहिरे करीत आहेत.