शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फसवणुकीचे बिंग फुटू नये, म्हणून केली कार चोरीची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:13 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या अमोल प्रदीप चौधरी (रा.वसई) या तरुणाची जानेवारी, २०२० मध्ये वैभव राणे (अंकित) नामक ...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या अमोल प्रदीप चौधरी (रा.वसई) या तरुणाची जानेवारी, २०२० मध्ये वैभव राणे (अंकित) नामक नावाच्या व्यक्तीशी नाशिक येथे भेट झाली. एका सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. डिस्ट्रिक्ट ऑडिटर म्हणून पुण्यात काम करीत असल्याचे राणे याने सांगितले, त्याशिवाय लेवा पाटील समाजाचेही कार्य करीत असल्याचे सांगितले, तसेच राणे याने स्टेट बँकेत ऑपरेशन शाखा व्यवस्थापक या पदावर तुझे काम करून देतो, असे आमिष अमोलला दाखविले. लॉकडाऊनमुळे हातचे काम गेल्याने अमोल यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. ५ जून, २०२० ते २३ जानेवारी, २०२१ या कालावधीत नोकरीची प्रोसेस करण्याच्या नावाखाली त्याने अमोल यांच्याकडून ४ लाख ६८ हजार रुपये घेतले. कोरोनामुळे सहा महिने काम लांबणीवर पडल्याचे सांगून काही दिवस लांबविले. त्यानंतर, ९ ते १६ जुलै, २०२१ या कालावधीत पुन्हा २१ हजार रुपये ऑनलाइन घेतले.

नाशिकहून सोबत आणले अन‌् कार चोरीची तक्रार दिली

नोकरीचे काय झाले, याची विचारणा करण्यासाठी अमोलने राणे याच्याशी १२ जुलै रोजी संपर्क केला असता, तुमचे काम झाले आहे, तुम्ही १६ जुलै रोजी नाशिकला या, आपण ये‌थून १७ रोजी नोकरीच्या प्रोसेसकामी जळगावाला जाऊ, असे सांगून अमोल यांना नाशिकला बोलावले. तेथून राणे याच्या कारने (क्र.एम.एच.१५ जी.एक्स ६५९९) पहाटे पाच वाजता जळगावसाठी निघाले. सकाळी साडेनऊ वाजता एका हॉटेलजवळ आले. तेथे मी तुझ्या कामाची प्रोसेस करण्यासाठी जातो, तू इथेच थांब व माझी कार तुझ्याजवळच राहू दे, असे सांगून राणे हा तेथून निघाला. थोड्याच वेळात अमोल यांना रामानंद नगर पोलीस ठाण्यातून फोन आला, तुम्ही कार चोरली आहे का, तुमच्याविरुद्ध तक्रार आली असून, तक्रारदार पोलीस ठाण्यात आहे, असे सांगितल्याने अमोल यांनी पोलीस ठाणे गाठले असता, तेथे राणे व एक मुलगी आधीच आलेली होती. पोलिसांना खरा प्रकार सांगितला असता, त्यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यात राणेचे खरे नाव अंकित गोवर्धन भालेराव व जी मुलगी होती, तिचे नाव स्वाती गोवर्धन भालेराव असे होते. दोघं भाऊ-बहीण असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, ऑनलाइन पैसे ज्या व्यक्तीच्या मोबाइलवर मागविले होते, ती व्यक्ती अंकितची आई रत्नमाला असल्याचे स्पष्ट झाले. दिवसभराच्या चौकशीअंती सोमवारी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आई, मुलगा व बहीण तिघे कोठडीत

अंकित उर्फ राणे याने अमोल चौधरीसह हेमंत सुभाष भंगाळे (वय ३३,रा.नेहरूनगर) या तरुणाला ४ लाख, पूर्वा ललित पोतदार (वय ३२, रा.पुणे) यांना ७ लाख ३० हजार, देवेंद्र सुरेश भारंबे (वय ३६, रा.भुसावळ) यांना २ लाख ४० हजार तर बांधकाम व्यावसायिक नितीन प्रभाकर सपके (वय ४५, रा.आनंदनगर, जळगाव) यांना १२ लाख ६० हजार रुपयात फसविल्याचेही निष्पन्न झाले. सहायक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी यांनी आई, मुलगा व मुलगी अशा तिघांना अटक करून, सोमवारी न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.