शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीचे बिंग फुटू नये, म्हणून केली कार चोरीची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:13 IST

जळगाव : बँकेत नोकरीसाठी पाच जणांकडून २९ लाख ८० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या अंकित गोवर्धन भालेराव (वय ...

जळगाव : बँकेत नोकरीसाठी पाच जणांकडून २९ लाख ८० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या अंकित गोवर्धन भालेराव (वय २८, रा.मुक्ताईनगर) (वैभव राणे डमी नाव) याने आपली कार चोरल्याचा बनाव करून रामानंदनगर पोलिसांकडे तक्रार दिली अन‌् तेथेच जाळ्यात अडकला. इतकेच काय, त्याच्या या कारनाम्यात सहभागी असलेली बहीण व आई हेही आयतेच पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या अमोल प्रदीप चौधरी (रा.वसई) या तरुणाची जानेवारी, २०२० मध्ये वैभव राणे (अंकित) नामक नावाच्या व्यक्तीशी नाशिक येथे भेट झाली. एका सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. डिस्ट्रिक्ट ऑडिटर म्हणून पुण्यात काम करीत असल्याचे राणे याने सांगितले, त्याशिवाय लेवा पाटील समाजाचेही कार्य करीत असल्याचे सांगितले, तसेच राणे याने स्टेट बँकेत शाखा व्यवस्थापक या पदावर तुझे काम करून देतो, असे आमिष अमोलला दाखविले. लॉकडाऊनमुळे हातचे काम गेल्याने अमोल यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. ५ जून, २०२० ते २३ जानेवारी, २०२१ या कालावधीत नोकरीची प्रोसेस करण्याच्या नावाखाली त्याने अमोल यांच्याकडून ४ लाख ६८ हजार रुपये घेतले. कोरोनामुळे सहा महिने काम लांबणीवर पडल्याचे सांगून काही दिवस लांबविले. त्यानंतर, ९ ते १६ जुलै, २०२१ या कालावधीत पुन्हा २१ हजार रुपये ऑनलाइन घेतले.

आई, मुलगा व बहीण तिघे कोठडीत

अंकित उर्फ राणे याने अमोल चौधरीसह हेमंत सुभाष भंगाळे (वय ३३,रा.नेहरूनगर) या तरुणाला ४ लाख, पूर्वा ललित पोतदार (वय ३२, रा.पुणे) यांना ७ लाख ३० हजार, देवेंद्र सुरेश भारंबे (वय ३६, रा.भुसावळ) यांना २ लाख ४० हजार तर बांधकाम व्यावसायिक नितीन प्रभाकर सपके (वय ४५, रा.आनंदनगर, जळगाव) यांना १२ लाख ६० हजार रुपयात फसविल्याचेही निष्पन्न झाले. सहायक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी यांनी आई, मुलगा व मुलगी अशा तिघांना अटक करून, सोमवारी न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.