शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकाची सात लाखात फसवणूक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 17:01 IST

दोघांनी  घातला गंडा : सोन्याचे सांगून दिले नकली मणी

प्राध्यापकाची सात लाखात फसवणूक  दोघांनी  घातला गंडा : सोन्याचे सांगून दिले नकली मणीयावल:    खोदकाम करीत असतांना   सापडलेल्या एक  किलो  सोन्याचे  मणी बनवले असून ते स्वस्तात विकावयाचे असल्याचे  सांगून दोन भामटयांनी  येथील विरारनगरातील एका सेवानिवृत्त प्राध्यापकाची सात लाख रुपयांमध्ये फसवणुक केल्याची घटना २४ आक्टोबरला घडली. मणी  घेतल्यांनंतर प्राध्यापकांनी ते सोनाराकडे तपासून पाहीले असता आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावरून रविवारी येथील पोलीस ठाण्यात दोन अज्ञात  भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     येथील  विरार नगरातील रहीवासी तथा  कला वाणिज्य महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक   एस.डी.पाटील यांच्याकडे शनिवारी दोन अज्ञात भामटे आले व आम्ही राजस्थानचे रहीवासी असून  एका ठिकाणी खोदकाम करतांना आम्हास जवळपास एक किलो सोन्याचे दागिने सापडले असून   आम्ही  त्या दागिण्यांचे   मणी केले आहेत.    बाजार भावानुसार  जवळपास ६० लाख रुपये किमतीचे दागीने आपणास केवळ सात लाख रुपयात देत आहोत, असे त्या दोघांनी सांगितले.  या आमीषाला प्रा. पाटील बळी पडत त्यांनी ते मणी रोख सात लाख रुपयात खरेदि केल विजयादशमीचे दिवशी त्यांनी ते मणी  मपासणीसाठी  नेले असता  ते नकली असल्याचे समजल्यावरून   रविवारी येथील पोलीस ठाण्यात प्रा. पाटील यांनी  दोन अज्ञात भामट्यांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.               शहरात चर्चा भामट्यांकडून दिलेल्या आमीषाला शहरातील एक सुशिक्षीत कुटूंब  बळी पडून त्यांचेकडून अल्पावधित सात लाख रुपयाची रोकड लंपास केल्याने शहरात या  घटनेची चर्चा चांगलीच रंगलीआहे.